आजचा वाढदिवस : शालिनी राधाकृष्ण विखे पाटील - shalini vikhe patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

आजचा वाढदिवस : शालिनी राधाकृष्ण विखे पाटील

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 1 डिसेंबर 2017

नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे- पाटील या विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी आहेत. देशात सहकारी साखर कारखान्याची मूहूर्तमेढ रोवणारे पद्‌मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या त्या नात-सून, तर पद्मभूषण (कै.) बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्या सुनबाई होत. विखे घराण्यातील राजकीय वारसा त्यांनी तितक्‍याच कणखरपणे जपला. कोपरगावच्या गोदावरी दूध संघाचे संस्थापक (कै.) नामदेवराव परजणे यांच्या शालिनी या कन्या आहेत. महिला बचत गटाच्या चळवळीला प्रोत्साहन देत त्यांनी बचत गटाची जत्रा भरविली. त्यातून साई ज्योती हे महिला बचत गट उत्पादनाचे प्रदर्शन भरविले.

नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे- पाटील या विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी आहेत. देशात सहकारी साखर कारखान्याची मूहूर्तमेढ रोवणारे पद्‌मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या त्या नात-सून, तर पद्मभूषण (कै.) बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्या सुनबाई होत. विखे घराण्यातील राजकीय वारसा त्यांनी तितक्‍याच कणखरपणे जपला. कोपरगावच्या गोदावरी दूध संघाचे संस्थापक (कै.) नामदेवराव परजणे यांच्या शालिनी या कन्या आहेत. महिला बचत गटाच्या चळवळीला प्रोत्साहन देत त्यांनी बचत गटाची जत्रा भरविली. त्यातून साई ज्योती हे महिला बचत गट उत्पादनाचे प्रदर्शन भरविले. जिल्ह्यातील महिलांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या. त्यांना विविध कार्यामुळे आदर्श माता, सावित्री पुरस्कार, गौराई पुरस्कार, क्रांतिज्योती पुरस्कार असे अनेक राज्यस्तरीय 
पुरस्कार मिळाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख