शालिनी विखे पाटील पंकजा मुंडे- दिलीप गांधींना जेंव्हा  शालजोडीतून चिमटे काढतात .....  - Shalini Vikhe - Pankaja Munde - Dilip Munde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

शालिनी विखे पाटील पंकजा मुंडे- दिलीप गांधींना जेंव्हा  शालजोडीतून चिमटे काढतात ..... 

मुरलीधर कराळे : सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 जानेवारी 2018

नगर  ः काॅग्रेसच्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी आज भाजपच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व खासदार दिलीप गांधी यांना भाषणातून चांगले शालजोडे दिले

नगर  ः काॅग्रेसच्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी आज भाजपच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व खासदार दिलीप गांधी यांना भाषणातून चांगले शालजोडे दिले

गांधी यांचा महिलांना लवकर कर्ज मिळतेहा मुद्दा खोडून काढत तुम्ही भाषणातून सांगतातसे होत नाहीअसे विखे यांनी स्पष्ट केलेतसेच बचत गटातून कमावलेले पैसे महिला नवऱ्यापासून लपवून ठेवत मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करतातहे मुंडे यांच्या वक्तव्यावर बोलत तुम्ही त्यांचे पैसे बाहेर काढले ( नोटबंदी )!असे विखे पाटील यांनी सांगताच सभागृहात हंशा पिकला.

सक्षम महिला महोत्सव व साईज्योती स्वयंसहायता यात्रा या उपक्रमांतर्गत महिला बचत गटाच्या प्रदर्शनास पंकजा मुंडे यांच्यासह खासदार गांधीशालिनी विखे पाटील उपस्थित होतेव्यासपीठावर पालकमंत्री प्राराम शिंदेआमदार मोनिका राजळे,जिल्हाधिकारी अभय महाजन तसेच मान्यवर उपस्थित होते

या वेळी भाजपच्या नेत्यांनी भाषणातून आपण बचत गटांसाठी व विशेषतः महिलांसाठी किती योजना आणल्या व कर्जे कसे तात्काळ मिळवून दिले हे सांगितलेहे वक्तव्य खोडून काढत काॅग्रेसच्या शालिनी विखे यांनी भाषणातून अप्रत्यक्षरित्या त्यांचा समाचार घेतला.

 

गांधी साहेबतुम्ही भाषणात सांगता तसे नाही

खासदार गांधी यांचे भाषण आधी झालेत्यांनी भाषणातून स्टॅण्डप इंडियाअंतर्गत महिला बचत गटांसाठी एका तासात कर्ज उपलब्ध होतेपैशाची कमी नाहीकाम करण्याची तयारी हवीमहिला बचत गटाला महापालिकेने तीन एकरचा प्लाॅट उपलब्ध करून दिल्यास महिला तेथे प्रदर्शन भरवू शकतीलअसे सांगितलेखासदार गांधी यांच्या भाषणानंतर शालिनी विखे यांचे भाषण झाले

त्यांनी भाषणातूनगांधी साहेब तुम्ही भाषणातून सांगतात तसे होत नाहीमहिलांना बॅंका कर्ज देत नाहीतकागदपत्रांच्या अनेक तृटी काढतातअसे म्हणताच महिलांमधून हे बरोबर आहेअशी चर्चा सुरू झाली.

अहोतु्म्हीच महिलांचे पैसे बाहेर काढले

पंकजा मुंडे यांनी भाषणातून बचत गटाच्या महिला आपल्या कष्टाची कमाई कशा पद्धतीने जपून वापरतातहे विषद केले.नवऱ्यापासून पैसे लपवून ठेवत महिला मुलींच्या शिक्षणासाठीघरातील आपत्कालिन परिस्थितीत हे पैसे वापरतातअसे मुंडे यांनी सांगितले

या प्रदर्शनात उत्पादने विकून मिळालेल्या पैशाचे काय करणारनवऱ्यापासून लपून ठेवणार की नाहीकोण कोण लपून ठेवणारहात वर कराअसे सांगताच एका महिलेने हात वर केला

त्यावर मुंडे यांनीही हात वर करीत आपण तर लपवून ठेवतोअसे सांगितलेत्यावर शालिनी विखे यांनी लगेच हजरजबाबीपणे अहोतुम्हीच तर महिलांचा पैसा बाहेर काढलाअसे सांगताच महिलांमधून हंशा पिकला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख