shaila godse resigns as tanaji sawant did not get ministerial berth  | Sarkarnama

मंत्रिमंडळांमध्ये तानाजी सावंतांना स्थान न मिळाल्याने आम्हाला पोरके झाल्यासारखे वाटत आहे - शैला गोडसे

हुकूम मुलाणी 
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

मंगळवेढा :- माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे सोलापूर जिल्हा महिला संघटक शैला गोडसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

याबाबत त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की गोरगरिबांना, शेतकरी /कष्टकरी ,वंचित घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करणारा पक्ष म्हणून शिवसेना पक्षाकडे बघितले जाते. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षापासून शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक म्हणून मी जबाबदारी पार पाडीत आहे. 

मागील काही वर्षांमध्ये आपल्याकडून तानाजी सावंत यांना ताकद देण्याचा प्रयत्न झाला. त्यांना कमी कालावधी साठी का होईना त्यांना थेट कॅबिनेट मंत्री केल्याने यांच्या माध्यमातून पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र, आताच्या मंत्रिमंडळांमध्ये सावंतांना स्थान मिळू शकले नाही. त्यामुळे आम्हाला पोरके झाल्यासारखे वाटत आहे कारण मी स्वतः व सामान्य शिवसैनिक थेट आपल्या पर्यंत नेहमी संपर्कात राहणे किंवा पोहोचणे शक्य होत नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आता कुणा मार्फत प्रयत्न करायचे असा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झाला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख