Shaila Godse Gives Interview for Shivsena Ticket From Pandharpur | Sarkarnama

पंढरपूरसाठी शैला गोडसेंनी दिली शिवसेनेच्या तिकीटासाठी मुलाखत

हुकूम  मुलाणी 
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

राज्यात भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्यातील युतीला अंतिम स्वरूप अजून प्राप्त झाले नसले तरी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळावी म्हणून जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला गोडसे यांनी मुंबईतील सेना भवन येथे मुलाखत दिली 

मंगळवेढा : राज्यात भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्यातील युतीला अंतिम स्वरूप अजून प्राप्त झाले नसले तरी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळावी म्हणून जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला गोडसे यांनी मुंबईतील सेना भवन येथे मुलाखत दिली 

या विधानसभा मतदार संघात इच्छुकांची संख्या वाढू लागल्याने नेत्यांसमोर उमेदवार निवडीचा गुंता देखील वाढण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत सरपंच आणि जि. प. सदस्य म्हणून काम केलेल्या कामाचा अहवाल लोकांसमोर ठेवून विधानसभेची बांधणी शैला गोडसे यांनी सुरू केली. पंढरपूर तालुक्यातील आंबेचिंचोलीच्या सरपंचपदाच्या सव्वा वर्षाच्या कामाचा अहवाल त्यानंतर मोहोळ मधील कुरूल गटात जि. प. सदस्य म्हणून काम केलेल्या कामाचा अहवाल लोकासमोर ठेवून पाणी आंदोलनातून विधानसभेचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे करित आहेत. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जलसंधारणमंत्री प्रा. सावंत यांच्या माध्यमातून त्या विधानसभेसाठी सज्ज झालेल्या गोडसे यांनी मंगळवेढा तालुक्यामधून पाणी आंदोलनात सहभाग घेत सुरूवात केली. त्याचबरोबर इतर प्रश्नातील आंदोलनाला स्वतः उपस्थित राहुन पाठींबा दिला याशिवाय महिलांमध्ये सध्या संपर्कामध्ये दारोदार आघाडी मारली.आ. भारत भालके नुकताच  रक्षाबंधनाचा सोहळा घेऊन मतदार रुपी बहिणीला भेट देण्याचा प्रयत्न केला. परंतु, गोडसे यांनी थेट घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. पूरग्रस्त भागाला केलेली तातडीची मदत व रखडलेल्या कामासाठी केला पाठपुरावा या जोरावर त्या विधानसभेच्या दावेदार समाजल्या जात आहेत.

पण युती जागा कुणाला हा संभ्रम असला तरी 1995 च्या जागा वाटपाच्या सूत्रांनुसार जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी पंढरपूर ची जागा शिवसेना असून ती जागा सोडणार नसल्याचा इशारा मित्रपक्ष असलेल्या भाजपाला दिल्यामुळे त्यामुळे शिवसेनेचा हक्क असणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. परंतु, भाजप-मित्र पक्ष- शिवसेनेच्या येत्या काही दिवसातील चर्चेनुसार हा मतदारसंघ कोणाला जाणार आहे, हे देखील पाहणे गरजेचे आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख