शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघ : सत्यजित पाटील व विनय कोरे यांच्यातच काट्याची लढत होणार

शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणूक मैदानात कितीही उमेदवार असले तरी यावेळीही शिवसेनेचे विद्यमान आमदार सत्यजित पाटील व जनसुराज्याचे माजी आमदार विनय कोरे यांच्यातच काट्याची लढत होणार असल्याचे चित्र आहे. विनय कोरे यांना गेल्या निवडणुकीतील निसटत्या पराभवाचा वचपा यावेळी काढायचा आहे, तर सत्यजित पाटील यांना विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा मतदार संघावर आपलेच वर्चस्व असलेचे सिध्द करायचे आहे.
Satyajeet Patil - Vinay Kore
Satyajeet Patil - Vinay Kore

शाहूवाडी : शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणूक मैदानात कितीही उमेदवार असले तरी यावेळीही शिवसेनेचे विद्यमान आमदार सत्यजित पाटील व जनसुराज्याचे माजी आमदार विनय कोरे यांच्यातच काट्याची लढत होणार असल्याचे चित्र आहे. विनय कोरे यांना गेल्या निवडणुकीतील निसटत्या पराभवाचा वचपा यावेळी काढायचा आहे, तर सत्यजित पाटील यांना विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा मतदार संघावर आपलेच वर्चस्व असलेचे सिध्द करायचे आहे.

त्या दृष्टीने तिसऱ्यांदा होऊ घातलेल्या या लढतीत मोठी चुरस असणार आहे. पक्षीय राजकारणापेक्षा येथे गटातटाचेच राजकारण अधिक रंगणार आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सत्यजित पाटील यांनी सहाशे कोटीवर विकास निधी आणून मतदारसंघातील दोन्ही तालुक्यात मोठी विकासकामे केली असल्याचा दावा केला आहे. विकासकामांबरोबरच त्यांनी दोन्ही तालुकयात जनसंपर्कही मोठा ठेवला आहे. लोकसभा निवडणूकित शिवसेनेचे धैर्यशील माने यांना मतदारसंघातून अधिक मताधिक्य देत पुन्हा एखदा मतदारसंघातील भगव्याचे वर्चस्व त्यांनी सिद्ध केले आहे. 

2004,2009 व 2014 च्या निवडणुकांचा विचार करता प्रत्येक निवडणुकीत पाटील यांच्या मताधिक्यात दहा हजाराहून अधिक मतांची वाढच झाल्याचे दिसते. शाहूवाडीतून मानसिंग गायकवाड यांची त्यांना मोठी साथ आहे.पन्हाळ्यातून बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांचीही साथ त्यांना मिळू शकते. शिवाय सेना भाजपा युती झाली तर आमदार पाटील यांना ती अधिकच फायद्याची ठरणार आहे.

जिल्हयाच्या राजकारणात विनय कोरे यांचा दबदबा आहे. जिल्हा परिषद,जिल्हा बँक आणि बाजार समितीच्या सत्तेत त्यांचा पक्ष आहे. मात्र, गतवेळच्या विधानसभा निवडणूकीत केवळ 388 मतांनी झालेला निसटता पराभव विनय कोरे यांच्या जिव्हारी लागला आहे.अति आत्मविश्वास अंगलट आल्याचे त्यांनी जाहिरपणे मान्य केले आहे. 388चा हा कलंक पूसून काढण्यासाठी त्यांनी आता कंबर कसली आहे. पन्हाळा आणि शाहूवाडीतून मोठे मताधिक्य मिळवण्यासाठी व्युहरचना केली आहे. शाहूवाडीतून कर्णसिंह गायकवाड,सर्जेराव पाटील पेरीडकर यांची त्यांना भक्कम साथ मिळते आहे. पन्हाळ्यातून अमरसिंह पाटील यांची मदत मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपशी कोरेंचे सख्य आहे. मात्र, लोकसभा निवडणूकीतील त्यांची मौनाची भूमिका विधानसभा निवडणुकीत फायदयाची कि तोट्याची ठरणार हे काळच ठरवणार आहे.

2004 मध्ये मतदारसंघाची नव्याने पूर्नरचना होऊन शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघ झाला. त्यावेळी मतदारसंघात प्रथम सत्यजित पाटील शिवसेनेचे आमदार झाले.2009 मध्ये जनसुराज्याचे विनय कोरे आमदार झाले. त्यांनी 8311 मतांनी सत्यजित पाटील यांचा पराभव केला.2014 मध्ये सत्यजित पाटील पुन्हा एकदा विजयी झाले.त्यांनी 388 मतांनी विनय कोरे यांना पराभूत केले. आता यावेळी मतदार राजा कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

शाहूवाडी -शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. मात्र, मतदारसंघातील स्थानिक राजकारणात काँग्रेस जनसुराज्य सोबत तर राष्ट्रवादी शिवसेने सोबत राहीली आहे.त्यामुळे गेल्या दोन वेळच्या निवडणुकांत काँग्रेसची रसद जनसुराज्याला तर राष्ट्रवादीची रसद शिवसेनेला मिळाली. त्यामुळे मतदार संघात आता काँग्रेस - राष्ट्रवादी नावापूरती राहिली आहे.

2009 चे मतदान -
1)विनय कोरे (जनसुराज्य) 73 हजार 912
2)सत्यजित पाटील(शिवसेना) 65 हजार 601
3)कर्णसिंह गायकवाड(काँग्रेस) 42 हजार 510
2014 चे मतदान -
1) सत्यजित पाटील(शिवसेना) 74 हजार 702
2) विनय कोरे (जनसुराज्य) 74 हजार 314
3) कर्णसिंह गायकवाड(काँग्रेस) 21 हजार 300
4)अमर पाटील(स्वाभिमानी) 27 हजार 953
5) बाबासाहेब पारील(राष्ट्रवादी) 4 हजार 671

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com