shahu maharaj about constitution | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करा : शाहू महाराज 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

सर्व जाती-धर्माचे लोक मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पाठिंबा देत आहेत. आजपर्यंत मराठा समाजाचा संयम पाहिला आहे. तो संपला की काय होईल, हे सांगता येत नाही. मराठा समाज कधीच कमजोर नव्हता आणि यापुढेही नसेल. 
सर्व जाती-धर्माचे लोक मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पाठिंबा देत आहेत. आजपर्यंत मराठा समाजाचा संयम पाहिला आहे. तो संपला की काय होईल, हे सांगता येत नाही. मराठा समाज कधीच कमजोर नव्हता आणि यापुढेही नसेल. 
-शाहू महाराज 

कोल्हापूर : "मराठा बांधवांनो, शांततेत मूक मोर्चे होऊनही सरकारला जाग येत नसेल, तर आता उठा पुढच्या तयारीला लागा,'' असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केले. 

"मराठा ठोक मोर्चा'वेळी ते बोलत होते. ऐतिहासिक दसरा चौकात समाजबांधवांसमोर त्यांनी सरकारविरोधात घणाघाती प्रहार केले. 

शाहू महाराज म्हणाले, "मराठा समाजाचा आवाज मुंबई व दिल्लीपर्यंत पोचल्याशिवाय आता राहणार नाही. जर तो सरकारने ऐकला नाही तर काय होईल, हे सांगता येत नाही. केवळ आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याच्या वल्गना गेली चार वर्षे सरकार करत आहे. शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे, ही समाजाची न्यायाची मागणी आहे. सर्व जण आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत आहेत. मग चार वर्षे का थांबला, हा प्रश्‍न आहे. राज्य व केंद्रात एकाच पक्षाची सत्ता आहे मग आरक्षण देण्यात अडथळा कोणता आहे? मराठ्यांच्या वेदना सरकारला कळत नाहीत का? अनेक वर्षांपासूनच्या या वेदना आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजालासुद्धा आरक्षण दिले होते. त्याच समाजाची स्थिती आता "ना घर ना घाट का,' अशी झाली आहे. ती बदलण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलावीत. जर आरक्षण देण्यात सरकार टाळाटाळ करत असेल, तर मराठा बांधवांनी पुढील तयारीला लागावे.'' 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख