शहापुरात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसला भाजपचा झटका 

शहापूर तालुक्‍यातील जुनोनी, जांभूळवाड, सुसरवाडी, चिल्हार परिसरातील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (ता. 12) भाजपमध्ये प्रवेश केला.
शहापुरात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसला भाजपचा झटका 

शहापूर : शहापूर तालुक्‍यातील जुनोनी, जांभूळवाड, सुसरवाडी, चिल्हार परिसरातील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (ता. 12) भाजपमध्ये प्रवेश केला. 

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या या प्रवेशामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का बसला आहे. भाजपचे खासदार आणि ठाणे विभागीय अध्यक्ष कपिल पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. 

या वेळी तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, अशोक इरनक, देविदास जाधव, रवींद्र पाटील, राम माळी, प्रभाकर रांजणे, रंजना उघडा आदी उपस्थित होते. 

काही वर्षांपासून तालुक्‍यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून स्वार्थी राजकारण केले जात आहे, तर भाजपकडून विकासावर भर दिला जात असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केला, असे या वेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. 

धनाजी सोगिर, जयप्रकाश सोगिर, करण सातपुते, नरेश सातपुते, अरुण ठाकरे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांचे खासदार पाटील यांनी स्वागत केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com