शहापूर "राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेशी युतीला विरोध 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्यास विरोध दर्शवला आहे. निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले.
शहापूर "राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेशी युतीला विरोध 

शहापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्यास विरोध दर्शवला आहे. निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात शहापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी (ता. 11) पक्षाच्या कल्पतरू सभागृहात झाली. यात निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. 

ग्रामपंचायत निवडणुकीत ज्यांच्याशी दोन हात केले, त्या शिवसेनेशी युती करण्यास कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला, तर काहींनी भाजप सोडून कुणाशीही आणि समविचारी पक्षांशी युती करा. ज्यांनी पक्ष स्थापनेपासून पक्षाचे प्रामाणिक काम केले त्यांना उमेदवारी देताना विचार करा, अशी मागणी केली. बैठकीत कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करून कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसन केले. 

आमदार पांडुरंग बरोरा यांनी तालुक्‍यातील गट आणि गणनिहाय पक्ष कसा मजबूत आहे. युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर असून काहीही झाले तरी शहापूर पंचायत समितीचा सभापती राष्ट्रवादीचाच होणार, असा विश्‍वास कार्यकर्त्यांना दिला. विकासकामाबाबत सांगून आजपासून प्रत्येकाने कामाला लागावे, असे त्यांनी या वेळी केले. 

बैठकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे व महिला जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे यांनीही मार्गदर्शन केले. तालुक्‍यातील ज्येष्ठ नेते अनंत शेलार, शिवाजी देशमुख, कैलास पडवळ, जैतू भोईर, काशिनाथ पष्टे, अविनाश थोरात, मिलिंद देशमुख, संजय निमसे, दत्ता पाटील यांच्यासह तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे माजी जिल्हा आणि पंचायत समितीचे सदस्य, पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरून दिले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com