'नाही...नाही' म्हणून गणपतआबा लोकांना भावनिक करतात!

त्यांनी निवडणूक लढवणार नाहीत असं जाहीर केलं असलंतरी मागील अनुभव पहाता ते निवडणूक लढवणार नाहीतच असं ठामपणे सांगता येत नाही. ते माझ्या विरोधातील उमेदवार असतील असे गृहीत धरूनच आम्ही तयारी केली आहे.
'नाही...नाही' म्हणून गणपतआबा लोकांना भावनिक करतात!
'नाही...नाही' म्हणून गणपतआबा लोकांना भावनिक करतात!

पुणे : "सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून मी ताकदीने लढणार आहे. हा मतदारसंघ महायुतीत कोणत्याही पक्षाकडे गेला तरी मलाच उमेदवारी मिळेल," असा विश्वास सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.

पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पाटील म्हणाले,"मी आजवर सहा निवडणुका लढलो. त्यातील एका निवडणुकीत मला विजय मिळाला इतर निवडणुकात माझा पराभव झाला. मी अनेकदा पराभूत झालो तरी खचलो नाही आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते न खचता माझ्यासोबत राहिले. माझ्या प्रतिकूल परिस्थितीच्या काळात माझ्यावर प्रेम करणारी जनता माझ्या सोबत राहिली त्यांच्या बळावर मी आजवर इथवर आलोय."

"आगामी विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात कोणीही उमेदवार असला तरी माझ्या पाच वर्षांच्या कामावर लोक मलाच विधानसभेत जायची संधी देतील. राज्यात पुन्हा एकदा भाजप शिवसेनेचे सरकार सत्तेवर येणार आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील जनताही विकासाच्या प्रवाहासोबत राहील. यावेळेचे वातावरण वेगळे आहे. लोकांना विकास हवा आहे. तो विकास शिवसेना भाजपच्या सरकारकडून होऊ शकतो," असे पाटील म्हणाले.

"आमदार गणपतराव देशमुख यांनी 'निवडणूक लढवणार नाही' असे जाहीर करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी दोन वेळा त्यानी असंच जाहीर केलं होतं. पण पुन्हा त्यांनी निवडणूक लढवली. निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केल्यावर लोक भावनिक होतात आणि त्याचा फायदा देशमुखांना होतो. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवणार नाहीत असं जाहीर केलं असलंतरी मागील अनुभव पहाता ते निवडणूक लढवणार नाहीतच असं ठामपणे सांगता येत नाही. ते माझ्या विरोधातील उमेदवार असतील असे गृहीत धरूनच आम्ही तयारी केली आहे. मेदवार कोणीही असला तरी तालुक्यातील जनता यावेळेस परिवर्तन घडवेल" असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com