मोदींच्या टीममध्ये अमित शहा, एस जयशंकर नव्याने दाखल

 मोदींच्या टीममध्ये अमित शहा, एस जयशंकर नव्याने दाखल

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या दुसऱ्या सरकारचे प्रमुख म्हणजे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या पदाची शपथ घेतली. त्याच्यानंतर राजनाथसिंह, अमित शहा, नितीन गडकरी, सुब्रम्हण्यम जयशंकर तसेच अन्य 20 जणांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेकडून अरविंद सावंत तर लोकजनशक्ती पक्षाकडून रामविलास पासवान यांनी आपल्या पदाची शपथ घेतली. अमित शहा यांना आता कुठले खाते देण्यात येते याबद्दल आता उत्सुकता आहे. 

मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात कोणाला संधी मिळते याकडे अनेकांचे लक्ष होते. अपेक्षेप्रमाणे मोदी यांच्या टीममध्ये अमित शहा आणि एस. जयशंकर यांचा नव्याने समावेश झाला. आधीच्या मंत्रिमंडळातले त्यांचे ज्येष्ठ सहकारी अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा या नव्या टीममध्ये समावेश नाही. जेटली यांनी प्रकृतीच्या कारणामुळे आपला समावेश करू नये असे आधीच कळवले होते. त्यांनी मंत्रिमंडळात यावे यासाठी काल भाजपच्या पातळीवर बरेच प्रयत्न करण्यात आले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी याप्रमाणे 
कॅबिनेट मंत्री - राजनाथसिंह, अमित शहा, नितीन गडकरी, सदानंद गौडा, निर्मला सीतारामन, रामविलास पासवान, नरेंद्रसिंह तोमर, रवीशंकर प्रसाद , हरसिमरन कौर, थावरचंद गेहलोत, सुब्रम्हण्यम जयशंकर, डॉ. रमेश पोखरीलाल निशंक, अर्जुन मुंडा, स्मृती इराणी, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, धर्मेद्र प्रधान, मुक्तार अब्बास नक्वी, प्रल्हाद जोशी, महेंद्रनाथ पांडे, अरविंद सावंत, गिरीराजसिंह, गजेंद्रसिंह शेखावत, 
राज्यमंत्री - संतोष कुमार गंगवाल, राव इंद्रजितसिंह, श्रीपाद नाईक, जितेंद्र सिंह, किरण रिजिजू, प्रल्हादसिंह पटेल, राजकुमार सिंह, हरदीपसिंग पुरी, फग्गनसिंह कुलस्थे अश्‍विनीकुमार चौबे, अर्जुनराम मेघवाल, व्ही के सिंह, कृष्ण पाल, रावसाहेब दानवे, जी किशन रेड्डी, पुरुषोत्तम रुपाला, रामदास आठवले, साध्वी निरंजन ज्योती, बाबुल सुप्रियो, संजीवकुमार बालियान, संजय धोत्रे, अनुरागसिंह ठाकूर, नित्यानंद राय, व्ही मुरलीधरन, रेणुका सिंह, सोमप्रकाश, रामेश्‍वर तेली, प्रतापचंद्र सरंगी, कैलास चौधरी देबाश्री चौधरी 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com