मनसेचे 'शॅडो' कॅबिनेट जाहीर; मात्र 'मुख्यमंत्री' पद रिक्तच - Shadow Cabinet of MNS Declared | Politics Marathi News - Sarkarnama

मनसेचे 'शॅडो' कॅबिनेट जाहीर; मात्र 'मुख्यमंत्री' पद रिक्तच

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 9 मार्च 2020

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चौदाव्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमात सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी 'शॅडो' कॅबिनेटची घोषणा करण्यात आली

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चौदाव्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमात सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी 'शॅडो' कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, अमित ठाकरे, नितीन सरदेसाई आदींचा या 'शॅडो' कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी या खात्यांची घोषणा केली. हे 'खातेवाटप' पुढील प्रमाणे :

गृह, विधी, न्याय, जेल - बाळा नांदगावकर, किशोर शिंदे ,संजय नाईक, राजीव उंबरकर, राहील बापट, अवधूत छावणी योगेश खैरे प्रसाद सारफरे डॉ अनिल गजने, जमील देशपांडे

जलसंपदा- अनिल शिदोरे

माहिती तंत्रज्ञान- अनिल शिदोरे, अमित ठाकरे

वित्त आणि नियोजन- नितीन सरदेसाई, हेमंत संभूस, वसंत फडके, मिलिंद प्रधान, पियुष छेडा, वल्लभ चित्रे,अनिल शिदोरे , अबिनाश अभ्यंकर, दिलीप कदम, कणाल माईंकर, अभिजित, श्रीधर जगताप

ऊर्जा- शिरीष सावंत, मंदार हळबे, सागर देवरे, विनय भोईटे

ग्रामविकास- जयप्रकाश बाविस्कर, अमित ठाकरे, परेश भोईर

वने, आपत्ती- संजय चित्र, अमित ठाकरे, वागेश सारस्वत, संतोष धुरी, आदित्य दामले 

शिक्षण-अभिजित पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर, बिपीन नाईक

कामगार- गजानन राणे सुरेंद्र सुर्वे

नगरविकास- संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येऊरकर, संदीप कुलकर्णी, फारुख लाला

सार्वजनिक आरोग्य- रिता गुप्ता, कुंड राणे

सहकार आणि पणन- वल्लभ चित्रे

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, "आम्ही महाराष्ट्राला आणि जनतेला बांधील आहोतच. महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो की सरकारवर अंकुश असावा म्हणून हे कॅबिनेट आहे. ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकायचे नाही. त्यासाठी हे स्थापन केलेले नाही. सरकारला समज हवी, म्हणून हे कॅबिनेट आहे,"

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख