पोलिस अधिकाऱ्याच्या तक्रार पेटीमुळे लैंगिक छळाचा प्रकार उघड - Sexual Exploitation case came to light from Amravati SPs Complaint Box | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिस अधिकाऱ्याच्या तक्रार पेटीमुळे लैंगिक छळाचा प्रकार उघड

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

अमरावती : विद्येचे दान देणाऱ्या शाळेतच एका नराधम शिक्षका कडून तबल तीन मुलीचा लैंगिक छळ झाल्याची संतापजनक घटना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका शाळेत घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षण संजय नागे याला अटक केली आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे मुलींवर होणारे अत्याचार असे प्रकार उघड व्हावेत, यासाठी जानेवारी महिन्यात पोलीस अधीक्षकानी अमरावती जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, बसस्थानक व इतर महत्वाच्या  ठिकाणी ३०० तक्रार पेट्या लावल्या आहे. शनिवारी दुसऱ्यांदा या तक्रार पेट्या उघडल्या असता हा प्रकार समोर आला आहे.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका गावातील शाळेत नराधम शिक्षक संजय नागे हा कार्यरत आहे.गेल्या काही दिवसांपासून तो तीन पीडित विद्यार्थीनी सोबत अश्लिल गैरवर्तन करत होता. तसेच विद्यार्थीनींनी त्याला विरोध करायचा प्रयत्न केला असता तो त्यांना मारहाणही करत असल्याचं समोर आलं आहे.दरम्यान शिक्षकाच्या या गैरवर्तणुकीला कंटाळलेल्या या विद्यार्थीनींनी या शिक्षकाच्या  सुरू असलेल्या कारनाम्याची तक्रार लिहून शाळेतील तक्रार पेटीत टाकून दिली. त्यानंतर आता जिल्ह्याभरातील तक्रार पेट्या दुसऱ्यांदा उघडल्या नंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारा संताप जनक प्रकार तक्रारी मधून समोर आला आहे.

या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ हरिबालाजी एन यांनी महिला पोलिसांचे एक विशेष पथक तयार करून संबंधीत शाळेच्या तपासणीसाठी पाठवले असता तक्रारीतील खरे तथ्य समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षक संजय नागेला अटक केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख