एका कोरोनाग्रस्तामुळे आठ हजार ग्रामस्थ 'होम क्वारंटाइन'

लासलगावला बेकरीत काम करणाऱ्या एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. हा नाशिक जिल्ह्यातील पहिला रुग्ण आहे. मात्र त्यानंतर सक्रीय झालेली यंत्रणा व आरोग्य कर्मचाऱ्यांची धावपळ यातून राज्य शासन किती गांभीर्याने 'कोरोना'चा मुकाबला करीत आहे याची चुणुक दिसली
One Found Positive of Corona in Lasalgaon
One Found Positive of Corona in Lasalgaon

नाशिक : लासलगावला बेकरीत काम करणाऱ्या एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. हा नाशिक जिल्ह्यातील पहिला रुग्ण आहे. मात्र त्यानंतर सक्रीय झालेली यंत्रणा व आरोग्य कर्मचाऱ्यांची धावपळ यातून राज्य शासन किती गांभीर्याने 'कोरोना'चा मुकाबला करीत आहे याची चुणुक दिसली. अहवाल मिळताच पहाटे साडे तीनलाच या गावात पोहोचलेल्या पथकाने सबंध गावाची तपासणी केली. परिसरातील सात गावे व आठ हजार जणांना 'होम क्वारंटाइन' करण्यात आले. त्यातून 'कोरोना'चा प्रभाव यंत्रणांचे कामातील गांभीर्य दोन्हीची जाणीव झाली.

रविवारी (ता.29) सायंकाळी लासलगाव येथे बेकरीत काम करणाऱ्या एकाचा अहवाल पॉझीटिव्ह आला. तोपर्यंत नाशिक जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. जिल्हा रुग्णालयाने यासंदर्भात तप्तरतेने कार्यवाही करुन त्याला आयसोलेट करीत उपचार सुरु केले. त्याच्या कुटुंबातील सात जणांची तपासणी केली. मात्र सबंध साथ रोग नियंत्रण पथक रात्रीच रवाना होऊन त्यांनी पहाटे साडे तीनला गावात उपाययोजना सुरु केली. संपूर्ण गावाला घरातच थांबण्याच्या सूचना देऊन त्याची कार्यवाही केली.

हा रुग्ण बेकरीत कामाला असल्याने त्याचा विक्रीच्या निमित्ताने परिसरातील अनेकांशी संबंध आला असावा, हे गृहित धरुन उपाययोजना केली. त्यात लासलगावजवळील पिंपळगाव नजीक गावात जिल्हा आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले असून, गावातील आठ हजार ग्रामस्थांना 'होम क्वारंटाइन' केले आहे. घरोघरी जाऊन घरातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली जात आहे. शिवाय ज्या गावात कोरोनाबाधित युवक गेला होता त्या गावातही आरोग्य पथक दाखल झाले आहे.

सात गावे 'होम क्वारंटाइन'

पिंपळगाव नजीक एक हजार 400 घरांचे आणि आठ हजार लोकवस्तीचे गाव आहे. मात्र, रविवारी रात्रीच हे गाव सील केले आहे. सोमवारी सकाळपासून आरोग्य पथकाने प्रत्येक घरी जाऊन ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी केली. कोरोनाबाधित युवक त्याच्या व्यवसायानिमित्त सात गावांमध्ये फिरला. त्या गावात आरोग्य पथक दाखल झाले आहेत. तसेच जे संबंधित युवकाच्या संपर्कात आले त्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे. ही

 सातही गावे होम क्वारंटाइन करण्यात आली आहेत. या कार्यवाहीची एव्हढी चर्चा झाली की, एरव्ही 'कोरोना' विषयी फारसे गंभीर नसलेल्यांनाही त्याचे पडसाद व परिणाम किती गभीर असु शकतात याची जाणीव झाली. या विषाणूंचा प्रसार गुणाकारत्मक स्तरावर वेगाने होते. त्यामुळे नागरीकांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य केले.

'त्या' युवकाच्या गावासह सात गावांमध्ये जाऊन तपासणी सुरू केली आहे. लक्षणे आढळली तर कोरोनाची चाचणी केली जाईल. सर्व सतर्कता घेतली जात आहे - डॉ. दावल साळवे, जिल्हा आरोग्यधिकारी, नाशिक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com