राष्ट्रवादीकडे हडपसरमधून सर्वाधिक इच्छुक; सात जणांचे पक्षाकडे अर्ज

राष्ट्रवादीकडे हडपसरमधून सर्वाधिक इच्छुक; सात जणांचे पक्षाकडे अर्ज

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुण्यातील आठ मतदारसंघांत 22 जणांनी उमेदवारी मागितली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त दिसून येत आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांना अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. त्यानुसार पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात 22 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत.

पुण्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून यामध्ये हडपसर विधानसभा मतदार संघात सहा जणांनी उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केलेला आहे. यामध्ये माजी महापौर प्रशांत जगताप, वैशाली बनकर, योगेश ससाणे, सुरेश घुले,लाला गायकवाड ,बंडू गायकवाड, नगरसेविका नंदा लोणकर यांनी अर्ज दिले आहेत.

खडकवासला मतदारसंघात नगरसेवक सचिन दोडके आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ,माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, पर्वती विधानसभा मतदारसंघातून स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम, शशिकांत तापकीर ,सचिन पासलकर यांनी अर्ज दिले आहेत.

कोथरूड मतदारसंघातून गणेश घोरपडे आणि संदीप बालवडकर असे दोन अर्ज आले आहेत. कसबा मतदारसंघातून गणेश नलावडे, रवींद्र माळवदकर यांते तर शिवाजीनगर मतदारसंघातून माजी सभागृह नेते नीलेश निकम, प्रदीप देशमुख, बाळासाहेब रानवडे, कॅन्टोंन्मेंट मतदारसंघातून शैलेंद्र जाधव आणि शांतीलाल मिसाळ यांनी तर वडगाव शेरी मतदारसंघातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापू पठारे नगरसेवक सुनील टिंगरे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मिसाळ यांनी कसबा मतदारसंघात देखील उमेदवारी मागितली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातून शहराध्यक्ष चेतन तुपे यांचेही नाव चर्चेत आहे. अद्याप त्यांनी शहर कार्यालयाकडे अर्ज दिला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com