सात जिल्ह्यांसाठी पालक सचिव नियुक्त - Seven Guardian Secretaries appointed By Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

सात जिल्ह्यांसाठी पालक सचिव नियुक्त

सरकारनामा ब्युरो
रविवार, 1 मार्च 2020

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रशासनात फेरबदल करतानाच सात जिल्ह्यांना नवे पालक सचिव दिले आहेत या संदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला आहे

मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रशासनात फेरबदल करतानाच सात जिल्ह्यांना नवे पालक सचिव दिले आहेत. त्यानुसार वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या संदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला.

उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांची सोलापूर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन यांची जालना, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांची परभणी, महिला आणि बालविकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन यांची अमरावती, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अन्शु सिन्हा यांची मुंबई उपनगर तर मराठी भाषा विकास विभागाच्या सचिव प्रजक्ता वर्मा यांची धुळे जिल्ह्याच्या पालक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित जीआर येथे उपलब्ध आहे
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख