ज्यांचा नेता बदलायचा तेच बाळासाहेबांना म्हणाले अरविंद शिंदेंना राहू द्या...

balasaheb thorat
balasaheb thorat

मुंबई : पुणे महापालिकेतील गटनेता बदलण्याची गरज ही नगरसेवकांची नसून पक्षातील काही नेत्यांची आहे. त्यामुळे महापालिकेत पक्षाची बाजू भक्कम मांडणाऱ्या गटनेत्याला बदलू नये, अशी मागणी पक्षाच्या काही नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे मुंबईत केली.

गटनेता बदलासाठी आग्रही असणाऱ्या नेत्यांनी गेल्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करत राजकारणच केले असल्याचा थेट आरोपही प्रदेशाध्यक्षांकडे केल्याने काँग्रेसमधील अर्तंगत वाद उफळला आहे. काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांना बदलण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसने शहर काँग्रेसला कळविला आहे.

या पार्श्वभूमीवर पक्षातील सात नगरसेवकांनी थेट प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री थोरात यांची मुंबईत भेट घेत गटनेतेपद बदलण्याच्या राजकारणाबाबत तक्रारी केल्या आहेत. गटनेतेपद बदलण्यासाठी आग्रही कोण आहे? पक्षाच्या नगरसेवकांना गटनेतेपदाचा बदल नको आहे. ज्यांना हवा आहे त्यांनी गत निवडणुकीत पक्षाचे काम केले का? या नेत्यांचे पक्षवाढीसाठी योगदान काय, अशा तक्रारी या नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षांकडे केल्याचे समजते. काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी मुंबईत थोरात यांच्याकडे गटनेतेपद बदलण्याच्या निर्णयास विरोध दर्शविला असून येत्या दोन वर्षांत महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुका वार्डपद्धतीने होणार असल्याने महापालिकेत पक्षाची भक्कम बाजू मांडणाऱ्या नेत्याची गरज आहे. त्यामुळे गटनेतेपद बदलू नये, अशी मागणीही या नगरसेवकांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com