आमदार विजय औटींचे नगरसेवक निलेश लंकेंनी पळवले? 

आमदार विजय औटींचे नगरसेवक निलेश लंकेंनी पळवले? 

नगर: शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या पारनेर नगरपंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षाची होणारी निवड प्रतिष्ठेची बनली आहे. शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या गटाचे जास्त नगरसेवक असतानाही सत्ता खेचण्यात अपक्ष यशस्वी होण्याची शक्‍यता आहे. 

तब्बल दहा नगरसेवक पळवून नेण्यात अपक्ष उमेदवार यशस्वी झाला आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार विजय औटी यांना मोठा धक्का देण्याची हिंमत अपक्ष उमेदवारात झाली कशी, असा प्रश्न तालुक्‍यातून व्यक्त होत आहे. यामागे शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष निलेश लंके यांचाच हात असल्याची चर्चा आहे. 

पारनेर पंचायतीच्या अध्यक्ष - उपाध्यक्षपदाची निवड उद्या (ता. 23) होत आहे. पंचायतीचे एकूण 17 नगरसेवक आहेत. त्यापैकी आमदार औटी यांच्याकडे 12 नगरसेवक होते. विरोधात केवळ पाच होते. त्यामुळे औटी यांचाच नगराध्यक्ष होण्यात होणतीही अडचण नव्हती. असे असताना दहा नगरसेवक अज्ञातवासात गेले. त्यामध्ये औटी यांचे पाच नगरसेवक आहेत, हे विशेष. 

आमदार औटी यांनी यापूर्वी काही नगरसेवकांना दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे नगरसेवकांचा एक गट नाराज होता. अडीच वर्षांपूर्वी अपक्षांची मोट बांधत आमदार औटी यांनी काही नगरसेवकांना अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा शब्द दिला होता. तो पाळला नसल्याने स्वतःचे हक्काचे नगरसेवकही ते सांभाळू शकले नाहीत. आमदार औटी गटाचे नाराज नगरसेवक तसेच काही अपक्ष नगरसेवक अपक्ष असलेल्या वर्षा नगरे यांना पाठिंबा देवून सहलीला निघून गेले असल्याचे समजते. 

आमदार औटी यांच्या विरोधात जावून त्यांचे नगरसेवक फोडण्याचे धाडस कोणात झाले, याबाबत तालुक्‍यातून चर्चा होत आहे. तालुक्‍यात भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे यांचे तीन नातेवाईक नगरसेवक आहेत. त्यांनी ही फोडाफोडी केल्याचे बोलले जात होते. मात्र दहा नगरसेवक पळविण्याची हिंमत ते करू शकणार नाहीत. औटी यांना दुसरा विरोधक म्हणून काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून व तालुकाध्यक्षपदावरून काढून टाकलेले निलेश लंके यांनीच हा डाव टाकला असल्याची चर्चा आता तालुक्‍यात पसरली आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नगर पंचायतीची निवडणूकही प्रतिष्ठेची झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com