भाजपाच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही : शरद पवार

...
sharad-pawar-kejriwal
sharad-pawar-kejriwal

पुणे : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यात अहंकार खूप होता. त्यांच्याबद्दल सत्ताधारी पक्षातही अस्वस्थता असून संसदेच्या सदस्यांमध्ये एक प्रकारची दहशत आहे. यामुळे नाराजी आहे. भाजपचे झारखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड असे पराभव झाले असून भाजपच्या पराभवाची मालिका थांबेल असे वाटत नाही', अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीच्या निकालानंतर दिली आहे.

दिल्ली निकालाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी थेट पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांना लक्ष्य केले. भाजपच्या पराभवाची मालिका थांबेल, असे वाटत नाही, असे सांगत पवार पुढे म्हणाले, 'दिल्ली निकालाचे मला आश्चर्य वाटले नाही. माझ्या दिल्लीतील निवास्थानावरील आणि तेथील मराठी लोकांशी बोललो, तेही केजरीवाल यांचेच नाव सांगायचे.'

'केजरीवाल यांनी दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडवले. यामुळे दिल्लीतील सामान्य जनता समाधानी होती. दिल्ली हे अन्य राज्यांपेक्षा वेगळे आहे. कारण दिल्लीत देशभरातील लोक राहतात. त्यामुळे दिल्लीचा निकाल हा दिल्ली पुरता मर्यादित नाही. दिल्लीत राहणाऱ्या परराज्यातील लोकांच्या मूळ  राज्यातही बदलाचे वातावरण आहे. आम्हा लोकांची आता ही जबाबदारी आहे. स्थिर आणि विकासकामांना प्रोत्साहन देणारे सरकार दिले पाहिजे', असेही पवार म्हणाले.

धार्मिक भावना चेतवून कटुता कशी वाढेल, याची काळजी भाजपने जाणीवपूर्वक घेतली, लोकांनी ती मान्य केली नाही', असा टोलाही पवार यांनी भाजपला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com