separate marathawada i will support raju shetty | Sarkarnama

वेगळ्या मराठवाड्याची मागणीच नसल्याने पाठिंब्याचा प्रश्‍नच नाही, राजू शेट्टींची भूमिका 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पुणे : छोटी छोटी राज्येही विकासाची मॉडेल ठरू शकतात. त्यामुळे तशी छोटी राज्ये असावीत या मताचा मी आहे. वेगळ्या विदर्भाला माझा पाठिंबा आहेच, पण स्वतंत्र मराठवाड्याची मागणी नसताना का पाठिंबा द्यायचा. मात्र छोटी छोटी राज्य झाली पाहीजेत असे आम्हाला वाटते, अशी भूमिका शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा आणि खासदार राजू शेट्टी यांनी मांडली. 

"सरकारनामा" फेसबुक लाईव्हमध्ये शेट्टी बोलत होते. मराठा आरक्षण, शेतीचे प्रश्‍न, केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारच्या एकूणच कारभारावर शेट्टी यांनी दिलखुलास बोलले. मराठा आरक्षण राज्यात पेटले आहे. मोठी हानी होत आहे. मराठवाड्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे उद्या जर कोणी स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी केली तर तुमचा त्याला पाठिंबा असेल का ? असा प्रश्‍न त्यांना केला. 

त्यावर शेट्टी म्हणाले, "" देशात छोटी राज्ये असावीत असे मला वाटते. तसे पाहिले तर पश्‍चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाचा अभाव आहे. पायाभूत सुविधा नाहीत. प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला चालना नाही. बॅंका शेतकऱ्यांला उभे करीत नाही. कापूस आणि सोयाबिन ही दोन पिके शेतकऱ्यांची दुश्‍मन आहेत. त्याचा फटकाही शेतकऱ्यांना बसतो आहे. या दोन पिकांचा जनावरांना फायदा होत नाही आदी कारणांमुळे मराठवाड्यात शेतकरी संकटात सापडला आहे.'' 

वेगळ्या मराठवाड्याची मागणी कोणी केली नाही त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्‍न येत नाही असे सांगून शेट्टी म्हणाले, की महाराष्ट्रात आज जिल्ह्यांची संख्या वाढलीच आहे. देशाचा विचार केला तर हिंदी भाषक असलेली राज्येही आहेत. त्यामुळे उद्या मराठी भाषक असलेली राज्य वाढली तर बिघडले कुठे. छोटी राज्ये ही विकासाची मॉडेल ठरू शकतात. छोटी राज्ये असायला हवी त्यासाठी वाद घालणे चुकीचे आहे.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख