senior congress mla may join bjp | Sarkarnama

तब्ब्ल 25 वर्षे काॅंग्रेस आमदार असलेला हा नेताही आता भाजपच्या वाटेवर?

अभिजित घोरमारे
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

गोंदिया : राज्यात काॅंग्रेसला हादरे बसण्याची लक्षणे कमी होताना दिसत नाहीत. रोज कोणता ना कोणता नेता भाजप किंवा शिवसेनेच्या वाटेवर जाताना दिसतो आहे. आता भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील गोंदियाचे काॅंग्रेसचे एकमेव आमदार गोपालदास अग्रवाल हे भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.  काॅंग्रेसच्या मंचावर भाजपच्या दोन मंत्र्याच्या उपस्थितिने या चर्चेला उधाण आले आहे. 

गोंदिया जिल्ह्याच्या खमारी येथे पाच कोटी खर्च करून भव्य आयुष्मान  भारत योजनेद्वारे तयार करण्यात आलेल्या "आरोग्य वर्धिनी केंद्राचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. काॅंग्रेस पक्षाचे निष्ठावान मानले जाणारे व 25 वर्षापासुन गोंदियाचे आमदार असलेले गोपालदास अग्रवाल भाजप प्रवेश करणाऱ असल्याची चर्चा रंगली आहे. या लोकार्पण सोहळयात काॅंग्रेसमधून नुकतेच भाजप पक्षात प्रवेश करणारे तथा महाराष्ट्र सरकार मध्ये गृहनिर्माण मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटिल हे उपस्थित होते.

विखे आपल्या बरोबर गोपालदास अग्रवाल यांना भाजपमध्ये नेणाऱ असल्याचे बोलले जात आहे. तसा सूचक सल्लाही विखे यांनी अग्रवाल यांना लोकार्पण सोहळयाच्या मंचावर देऊन टाकला आहे.

अग्रवाल हे मागील 25 वर्षांपासून काँंग्रेसचे आमदार असुन दोन वेळा विधान परिषदेवर तर तीन वेळा गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत. तसेच गेल्या पाच वर्षांपासून लोकलेखा समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर गोंदिया जिल्ह्यातून काॅंग्रेस नामशेष होईल, हे मात्र निश्चित.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख