Senior Clerk Conducted Meeting at Jalgaon | Sarkarnama

अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांची शक्कल भारी.... वरीष्ठ लिपीकच केला कारभारी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असलेल्या अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी तर राज्यात बैठकीसाठी मंत्रालयातील वरीष्ठ लिपीकालाच सोबत घेतले असून 'चहा पेक्षा किटली गरम'याप्रमाणे जिल्हास्तरावर आयोजित बैठकीत हे लिपीकच अध्यक्षांच्या उपस्थित त्यांच्या समोर बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत आहे. जळगाव येथेही आज झालेल्या बैठकित या वरीष्ठ लिपीकांनेच बैठक चालविली.

जळगाव : मध्यप्रदेशात मंत्र्यांना भाषण येत नसल्याने 'अगला भाषण कलेक्‍टर करेंगे' असे म्हणत समारंभात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्धे भाषण पूर्ण करण्याची जाबबदारी दिली होती. परंतु, महाराष्ट्र तर त्यापुढे गेला असून कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असलेल्या अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी तर राज्यात बैठकीसाठी मंत्रालयातील वरीष्ठ लिपीकालाच सोबत घेतले असून 'चहा पेक्षा किटली गरम'याप्रमाणे जिल्हास्तरावर आयोजित बैठकीत हे लिपीकच अध्यक्षांच्या उपस्थित त्यांच्या समोर बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत आहे. जळगाव येथेही आज झालेल्या बैठकित या वरीष्ठ लिपीकांनेच बैठक चालविली.

राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी हाजी अरफात शेख यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. सद्या ते राज्याच्या दौऱ्यावर असून प्रत्येक जिल्ह्यात जावून ते अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. मात्र या बैठका चालविण्यासाठी मंत्रालयातील वरीष्ठ लिपीकालाच अधिकार दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांचे स्वीय सहाय्यक वेगळे आहेत. आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. यावेळीही याच वरीष्ठ लिपीकांनी ही बैठक चालवली.

यावेळी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख उपस्थित होते.बैठकित वरीष्ठ लिपीक असलेले गणेश सुरवसे यांनीच प्रत्येक विषयावर माहिती घेवून जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची खरडपट्टीही केली. विशेष संपूर्ण बैठकीत अध्यक्ष काहीच बोलले नाहीत. केवळ बैठकीच्या शेवटी त्यांनी मनोगत व्यक्त केले. विशेष म्हणजे शेख यांच्या समवेत त्यांचे स्वीय सहाय्यकही होते. मात्र, ते बाजूला बसले होते. शेख यांनी दौरा केलेल्या २५ जिल्हयातील बैठक वरिष्ठ लिपीक सुरवसे यांनीच घेतली असल्याचेही सांगण्यात आले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख