भंडाऱ्याचे पार्सल परत पाठवा - मुख्यमंत्री

नाना पटोले ज्या पक्षात असतात, तेथे वाद करतात, नंतर ते दुसऱ्या पक्षात जातात. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी भंडाऱ्यातही कामे केली नाही. या भंडाऱ्याच्या पार्सलला वेगाने परत पाठवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
भंडाऱ्याचे पार्सल परत पाठवा - मुख्यमंत्री

नागपूर : नाना पटोले ज्या पक्षात असतात, तेथे वाद करतात, नंतर ते दुसऱ्या पक्षात जातात. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी भंडाऱ्यातही कामे केली नाही. या भंडाऱ्याच्या पार्सलला वेगाने परत पाठवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

''गंगा कधीही शुद्ध होऊ शकत नाही, असे म्हणणारेच आज त्यात आंघोळ करीत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळेच हे शक्‍य झाले. गडकरी अशक्‍यही शक्‍य करणारे नेते आहेत," असे मुख्यमंत्री म्हणाले. निवडणूक येताच कॉंग्रेसला गरिबांची आठवण येत असल्याची टीकाही त्यांनी केली.

भाजप-सेना युतीचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी इतवारी शहीद चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार विकास कुंभारे, आमदार गिरीश व्यास, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, माजी महापौर प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी, सेनेचे मंगेश कढव, बंडू राऊत आदी उपस्थित होते.

गडकरींमुळेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सर्वेक्षणानुसार जगाच्या पहिल्या 10 विकसित शहरात नागपूरचा समावेश झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी कॉंगेसवरही चांगलीच टीका केली.देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्‍वासन कॉंग्रेसने दिले आहे. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासने सीमेवरील जवानांच्या आत्मविश्‍वासाचे खच्चीकरण करणारे आहे. मतांसाठी कॉंग्रेस देशालाही विसरली, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक येताच कॉंग्रेस गरिबी हटावचा नारा देते, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com