सत्तार यांच्या अटकेसाठी शिवसेनेचा रास्तारोको

सत्तार यांच्या अटकेसाठी शिवसेनेचा रास्तारोको

औरंगाबाद : शेतकऱ्याला मारहाण व शिवीगाळ करतांना हिंदू देवतांचा केलेल्या आक्षेपार्ह उल्लेखावरून सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात वातावरण तापले आहे. अब्दुल सत्तार यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी सिल्लोड शिवसेनेच्या वतीने आज (ता.16) रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

दहिगांव शिवारातील शेतात जाऊन मंगळवारी (ता. 13) शेतकऱ्यांना मारहाण व गलिच्छ भाषेत शिवीगाळ करणाऱ्या आमदार सत्तार यांच्या विरोधातला रोष वाढू  लागला आहे. शिवीगाळ करतांना हिंदू देवतांचा उल्लेख व विटंबना केल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून सिल्लोड व औरंगाबाद जिल्ह्यात  ठिकठिकाणी सत्तार यांच्या विरोधात आंदोलन, निदर्शने सुरु झाली आहेत. सिल्लोड शहरातील आंबेडकर चौकात शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी सत्तारांच्या अटकेच्या मागणीसाठी सकाळी रास्तारोको करण्यात आला.

अब्दुल सत्तार यांच्या शिवीगाळीचा हा व्हिडिओ

नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते सुनील पाटील मिरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची जमीन हडपणाऱ्या, हिंदू देवतांची विटंबना करणाऱ्या अब्दुल सत्तार यांना अटक झालीच पाहिजे, शिवसेना झिंदाबादच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिवसेनेच्या रास्तारोकोमुळे या चौकातील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.

हिंदूजागरणच्या वतीने सिल्लोड बंदची हाक
शेतकऱ्याला मारहाण व हिंदू देवतांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ व सत्तार यांच्या अटकेच्या मागणीसाठी हिंदूजागरण मंचच्या वतीने उद्या, शनिवारी (ता. 16) सिल्लोड बंदची हाक देण्यात आली आहे. भाजपने यापुर्वीच तहसीलदारांना निवेदन देऊन सत्तार यांच्या कृत्याचा निषेध नोंदवला होता. भाजप, शिवसेना व आता हिंदूजागरण मंच देखील सत्तारांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com