Sena MP's beats Air India staffer by Chappal | Sarkarnama

सेनेच्या खासदाराची एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 मार्च 2017

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने आपल्यासोबत गैरवर्तन केलं, त्यामुळे त्याला मारलं. मी त्याला माझी बाजू समजावून सांगत होतो. पण त्याची अरेरावी सुरु होती. त्यामुळे पायातली चप्पल काढून तब्बल पंचवीस फटके मी त्याला मारले - रविंद्र गायकवाड (वाहिन्यांशी बोलताना)

नवी दिल्ली : शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे.

बसण्याच्या जागेवरुन वाद झाला. त्यानंतर एअर इंडियाचा कर्मचारी आणि गायकवाड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. रवींद्र गायकवाड हे आज पुण्याहून दिल्लीला जात होते. त्यांचं बिझनेस क्लासचं तिकीट होतं, मात्र त्यांना इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं. यावरुन त्यांची क्रू मेंबर सोबत वादावादी झाली.

दरम्यान एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने आपल्यासोबत गैरवर्तन केलं, त्यामुळे त्याला मारलं, असं स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिलं आहे. रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख