...तर अजित पवार यांनी भाजपमध्ये सगळ्यात पहिला प्रवेश करायला हवा होता!- 'सामना'चा टोमणा!

...तर अजित पवार यांनी भाजपमध्ये सगळ्यात पहिला प्रवेश करायला हवा होता!- 'सामना'चा टोमणा!

भाजप-शिवसेनेत सध्या इनकमिंगचे वारे आहे. कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांव याबाबत टीका केली होती. ईडीच्या कारवाईची धमकी देऊन पक्ष प्रवेश करुन घेतले जात असल्याचा आरोप पवार यांनी केला होता. या सगळ्याबाबत शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून कडाडून टीका केली आहे. दबाव असता तर अजित पवार यांनी भाजपमध्ये सर्वात पहिल्यांदा प्रवेश करायला पाहिजे होता, असा टोमणा 'सामना'च्या अग्रलेखात मारण्यात आला आहे.

मुंबई : भाजप-शिवसेनेत सध्या इनकमिंगचे वारे आहे. कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांव याबाबत टीका केली होती. ईडीच्या कारवाईची धमकी देऊन पक्ष प्रवेश करुन घेतले जात असल्याचा आरोप पवार यांनी केला होता. या सगळ्याबाबत शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून कडाडून टीका केली आहे. दबाव असता तर अजित पवार यांनी भाजपमध्ये सर्वात पहिल्यांदा प्रवेश करायला पाहिजे होता, असा टोमणा 'सामना'च्या अग्रलेखात मारण्यात आला आहे. 

'पक्षांतराला लोकशाहीच्या नव्या व्याख्येत यास ‘जिवंत लोकशाही’ म्हटले जाते. जिवंतपणाचे जरा जास्तच अजीर्ण महाराष्ट्राला झाले आहे काय? महाराष्ट्रातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘घाऊक’ पक्षांतराने वाहून गेला आहे. इन्कम टॅक्स, ‘ईडी’सारख्या एजन्सीचा वापर करून आमदार फोडले जात आहेत असा पवारांचा आरोप आहे. शिवसेनेकडे आयकर, ईडी, पोलीस या संदर्भातली कोणतीही खाती नाहीत. त्यामुळे हा आरोप शिवसेनेस लागू होत नाही. गंभीर गुन्हे व चौकशांची तलवार डोक्यावर असलेले लोक काँग्रेस पक्षात होते व तेच भीतीपोटी पक्षांतर करीत आहेत. दबाव असता तर अजित पवार यांनी भाजपमध्ये पहिला प्रवेश कराल हवा होता. भाजपमध्ये सध्या जी ‘आयाराम’ मंडळींची रीघ लागली आहे ती स्वार्थासाठी लागली आहे. पाटलांच्या या वक्तव्यामुळे कुणाला धक्का वगैरे बसण्याचे कारण नाही. सध्याच्या राजकारणातले ‘कटू’ सत्य त्यांनी कोल्हापुरी ठसक्यात सांगितले आहे.'...असे 'सामना'ने म्हटले आहे. 

गेल्या पाचेक वर्षांत भारतीय जनता पक्षात ‘इनकमिंग’ वाढले आहे ते काही विचार किंवा तत्त्वे पटत आहेत म्हणून नाही अशी भाजपवर अप्रत्यक्ष टीकाही या अग्रलेखात करण्यात आली आहे.....'सत्तेचे लोहचुंबक व राजकीय सोय हेच त्यामागचे कारण आहे. जिथेसत्तेच्या गुळाची ढेप तेथे मुंगळे जाणार व ढेपेस चिकटून बसणारच हा राजकीय नियमच बनला आहे. काँग्रेस पक्षाला शिव्या घालणारे, लाखोल्या वाहणारे भले भले लोक एका रात्रीत चार आण्याची गांधीटोपी डोक्यावर चढवून काँग्रेसवासी झालेले देशाने पाहिले आहेत. इंदिरा गांधी यांनी तर स्वतःचाच पक्ष फोडला व विरोधी पक्षही फोडले. इंदिरा लाटेवर तेव्हा सगळेच स्वार झाले होते जसे आज मोदी लाटेवर स्वार झाले आहेत. शिवसेनेच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रात पक्षांतराचे रेशनिंग सुरू आहे, पण रेशनिंग दुकानात पूर्वी व्हायचा तसा काळाबाजार येथे नाही. कुणाला जोरजबरदस्ती करून शिवसेनेने फरफटत आणले नाही. बुडत्या जहाजातून उंदीर, बेडूक पटापट उड्या मारतात, पण बोटीचे कप्तान व इतर महत्त्वाचे लोक सगळय़ात शेवटी धीराने बाहेर पडतात. आम्ही अशा ‘धीरा’च्या लोकांना नक्कीच घेत आहोत व त्याबद्दल राज्यातील काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवाल्यांना खळखळ करायची गरज नाही....' असेही या अग्रलेखातून सुनावण्यात आले आहे.

पूर्वी छगन भुजबळ, नारायणा राणेंसारखे नेते शिवसेनेतून बाहेर पडून राष्ट्रवादीमध्ये किंवा काँग्रेसमध्ये गेले. त्याची खदखदही 'सामना'च्या अग्रलेखात व्यक्त झाली आहे....'शिवसेनेची पंचवीस-पंचवीस वर्षे ‘वतनदारी’ केलेले लोक तुम्ही याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गुळाच्या ढेपेवर नेऊन बसवलेच ना? शिवसेनेने निवडून आणलेले आमदार, माजी मुख्यमंत्री, महापौर वगैरे लोक तुम्ही ‘तत्त्व’ आणि ‘त्याग’ वगैरे उपाध्या लावून शुद्ध करून घेतलेच ना? राजकारणातून तत्त्व, विचार, निष्ठा हे शब्द हद्दपार झाले आहेत.लाखो शिवसैनिकांच्या काबाडकष्टातून शिवसेना उभी राहिली व पुढे गेली, याची जाणीव आम्हाला सदैव आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे राज्य पुन्हा यावे ही तर श्रींचीच इच्छा आहे...' असे या अग्रलेखात म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com