दिंडोरीत सेना-भाजप युतीच्या समन्वय समितीपासून शिवसेनेचे आमदार अलिप्तच?

दिंडोरी लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे तीन आमदार, दोन जिल्हाप्रमुख, एक संर्पकप्रमुख अशी पदाधिकाऱ्यांची फळी आहे. मात्र, शिवसेना भाजप युतीच्या समन्वय समितीत यातील एकालाही स्थान मिळालेले नाही. शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी भाजपला कितपत मदत करतील याविषयी साशंकता व्यक्त होऊ लागली आहे.
दिंडोरीत सेना-भाजप युतीच्या समन्वय समितीपासून शिवसेनेचे आमदार अलिप्तच?

नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे तीन आमदार, दोन जिल्हाप्रमुख, एक संर्पकप्रमुख अशी पदाधिकाऱ्यांची फळी आहे. मात्र, शिवसेना भाजप युतीच्या समन्वय समितीत यातील एकालाही स्थान मिळालेले नाही. शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी भाजपला कितपत मदत करतील याविषयी साशंकता व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे समन्वय समितीची फेररचना करण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे.

शिवसेना- भाजप युतीतील समन्वयासाठी वीस पदाधिकाऱ्यांची समन्वय समिती स्थापन झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पालकमंत्री गिरीश महाजन व शिवसेनेतर्फे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली समन्वय समितीला मान्यता देण्यात आली. मात्र, त्यात दिंडोरी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना स्थानच नाही. त्यामुळे दिंडोरीत युतीच्या पदाधिकाऱ्यांची तोंड अजूनही वेगवेगळ्या दिशेला आहेत. रविवारी झालेल्या युतीच्या मनोमिलन मेळाव्यात एका बाजूला नाशिक महापालिकेतील शिवसेनेचे महापालिका पदाधिकारी मेळाव्यासाठी पुढाकार घेत होते. दुसरीकडे दिंडोरी मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना स्थान दिले गेले नाही. त्यामुळे संबधित पदाधिकारी तोंड दाखविण्यापुरतेच सहभागी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

युतीने जाहीर केलेल्या समन्वय समितीमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांसह भाजपचे माजी आमदार वसंत गिते, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, शिवसेनेचे संपर्क नेते भाउसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शहरप्रमुख सचिन मराठे, दत्ता गायकवाड, प्रशांत जाधव, महेश बडवे, नगरसेवक सर्वश्री सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, अजय बोरस्ते यांचा समावेश आहे. यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांचा अपवाद वगळता दादा भुसे धुळे मतदार संघातील आहेत.

शिवसेना पदाधिकाऱ्यांवर अविश्‍वास?
दिंडोरी लोकसभेतील शिवसेनेचा एकही पदाधिकारी नाही. सुहास कांदे आणि सुनील पाटील असे शिवसेनेचे दोन जिल्हाप्रमुख, आमदार अनिल कदम, नरेंद्र दराडे, किशोर दराडे हे तीन आमदार, संर्पकप्रमुख जयंत दिंडे यांसह एकाही जिल्हा परिषद सदस्यांनाही स्थान नाही. जिल्हाप्रमुख सुहास कांदे सध्या पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने फरारी आहेत. त्यामुळे सुनील पाटील यांची निवड अपेक्षित होती. मतदारसंघात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यात वाटा असलेल्या जयंत दिंडे यांच्यासह आमदारांनाही युतीच्या समन्वयापासून दूर ठेवल्याने समन्वय फक्त नाशिकची जागा राखण्यासाठीच असल्याचा अन्वयार्थ लावला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com