दिवाकर रावते, दीपक सावंत, रामदास कदम यांची मंत्रिमंडळातून 'एक्सिट'? - Sena may change 3 ministers | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

दिवाकर रावते, दीपक सावंत, रामदास कदम यांची मंत्रिमंडळातून 'एक्सिट'?

सुचिता रहाटे
मंगळवार, 6 जून 2017

येत्या जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होईल. त्यापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची माहिती सुंत्रांकडून मिळाली. त्यापूर्वी या तिन्ही नेत्यांच्या जागी कोणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुंबई - आरोग्य मंत्री दीपक सावंत, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम या सेनेच्या त्रिमुर्तींचे मंत्रीपदावरु 'डीमोशन' होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. खुद्द 'मातोश्री'तूनच नाराजीचे सुर उमटत असल्याने या तीनही नेत्यांच्या मंत्रीपदाला ग्रहण लागल्याची माहिती सुत्रांनी दिली.

तिन्ही नेत्यांची 'पक्षसंघटना बांधणीच्या जबाबदारी'साठी मंत्रिमंडळातून पदमुक्त केली जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्य मंत्रिमंडळातील शिवसेना मंत्र्यांचे खांदेपालट करण्याच्या तयारीत असून त्याबाबत गांभिर्याने विचार करत असल्याचे सूत्रांकडून बोलले जात आहे.

येत्या जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होईल. त्यापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची माहिती सुंत्रांकडून मिळाली. त्यापूर्वी या तिन्ही नेत्यांच्या जागी कोणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

शिवसेनेच्या अजेंड्यावर 'मिशन कोकण'
शिवसेना नेत्यांमध्ये मंत्रिपद मिळविण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. त्यासाठी सेनेच बरेच नेते मातोश्रीच्या पायऱ्या झिजवत आहेत. परंतु, सेनेच्या 'कोकणी नेत्यांची' मंत्रीपदावर वर्णी लागण्याची शक्यता सुत्रांकडून मिळाली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख