Sena Leaders my discuss mid term poll strategy | Sarkarnama

सेनेच्या बैठकीत मुदतपूर्व निवडणुकांबद्दल चर्चा?

ब्रह्मदेव चट्टे : सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 मार्च 2017

सेनेच्या सततच्या विरोधाला कंटाळून भाजपने स्थिर सरकार बनवण्यासाठी मध्यवधी निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संभाव्य राजकीय परिस्थितीत शिवसेनेच्या राजकिय भूमिकेबाबत चर्चा या बेठकीत करण्यात येणार आह- सूत्रांची माहिती

मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या बदलेल्या भूमिकेबाबत काय निर्णय घ्यायचा या संभ्रमात सध्या शिवसेना आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यवधी निवडणुकीची शक्यता लक्षात घेता रणनिती ठरवण्यासाठी आज पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली आहे." मातोश्री"  या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी सायंकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे.

सध्याच्या राजकीय परिस्थीतीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडून भाजप शिवसेनेशिवाय सरकार बनवण्याच्या हलचाली करत आहे. त्यामुळे सरकारमधील सेनेच्या भूमिकेबद्धल चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली असल्याचे सांगण्यात येत आहे. सेनेचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चाही जोरात आहेत. त्यामुळे सेनेच्या आमदारांची मनधरणी करण्याचा कसा प्रयत्न करायचा याविषयीही खलबते या बैठकीत होणार असल्याचे समजते. शिवसेना सातत्याने सत्तेत आल्यापासून सरकारवर टीका करत आहे. हे सरकार नालायक असल्याचे सांगण्याची मजल सेना नेत्यांची गेल्याने भाजप वेगळा विचार करत असल्याच्या बातम्याही प्रसिध्द झाल्या आहेत.

सेनेच्या सततच्या विरोधाला कंटाळून भाजपने स्थिर सरकार बनवण्यासाठी मध्यवधी निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संभाव्य राजकीय परिस्थितीत शिवसेनेच्या राजकिय भूमिकेबाबत चर्चा या बेठकीत करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. भाजपच्या दबाव तंत्राला बळी न पडता सरकारमधून बाहेर पडण्याची आग्रही मागणी काही आमदारांनी केली आहे. त्याचबरोबर सेना मंत्री आणि आमदारांमध्ये असलेल्या विसंवादावरही या बैठकीत मार्ग काढण्यात येणार आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत पक्षाची भुमिकेबाबतही या बैठकीतचर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 25 हजार मते आहेत. तर भाजपला या निवडणुकीत 20 हजार मतांची आवश्कता भासणार आहे. त्यामुळे शिवसेना भाजपला कोंडीत पकडू शकते. यासर्व बाबींचा विचार करण्यासाठी हा बैठक महत्वपुर्ण असल्याचे साघण्यात येत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख