संजय राऊत यांच्याऐवजी प्रशांत किशोर `स्ट्रॅटेजिस्ट` ठरल्याने सेना नेत्यांना उकळया!

संजय राऊत यांच्याऐवजी प्रशांत किशोर `स्ट्रॅटेजिस्ट` ठरल्याने सेना नेत्यांना उकळया!

मुंबई ः भाजपला सन 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवून देणा-या प्रशांत किशोर यांची निवडणूक स्ट्रॅटेजी मिळणार असल्याने शिवसेनेच्या नेत्यांच्या मनात उकळया फूटू लागल्या आहेत.

प्रशांत किशोर सध्या जेडीयूचे बिहार प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेचे उधाण आले होते. उद्धव ठाकरे यांनी देखिल पक्षाचे खासदार आणि पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती.

शिवसेनेची सर्व स्ट्रटेजी हे खासदार संजय राऊत हे ठरवत असल्याचे बाहेर चित्र आहे. राममंदिरासाठी अयोध्या वारी, ठाकरे चित्रपट, दिल्लीतील सेनेचा आवाज अशी सारे जबाबदारी राऊत यांनी सांभाळल्याने त्यांचे वजन वाढले आहे. राऊत यांच्या स्ट्रॅटेजीऐवजी आता प्रशांत किशोर हे नाव चर्चेत आल्याने राऊत विरोधकांना आनंद झाला आहे.

सेना नेत्यांना निवडून येण्यासाठी काय करावे लागेल, याचे प्रात्यक्षिक प्रशांत किशोर यांनी सेनेच्या खासदारांना दिले. तसेच आगामी निवडणुकीसाठी हा मंत्र शिवसेनेसाठी मोफत देणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यामुळे आगामी निवडणुकीत निश्‍चितपणे निवडून येण्याचा मंत्र फुकटात मिळणार असल्याने शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि नेते खुशीत असल्याचे शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले.

त्याचबरोबर भाजपसोबत युती करून एनडीएमध्ये सामिल झाल्यास शिवसेनेचे किंमान 20 खासदार निवडून देवू, असा दावाही किशोर यांनी केल्याचे समजते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होणार का, या बाबत तर्कवितर्क लढविले जात असताना प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे युती होण्याच्या दिशेने शिवसेनेची वाटचाल सुरू झाल्याची चर्चा आहे

युतीच्या चर्चेसाठीच प्रशांत किशोर यांना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पाठविल्याची चर्चा आहे. युती न करता निवडणूक लढविल्यास मोठे नुकसान होण्याची शिवसेनेला भिती आहे. तसेच स्वतंत्र लढण्यास अनेक खासदार इच्छुक नसल्याचे सेना नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे युती करून प्रशांत किशोर यांच्या स्ट्रॅटेजीमुळे फायदा होणार असेल तर त्याचा फायदा का घेवू नये, अशी चर्चा शिवसेनेतच सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com