कबड्डीच्या योगदानासाठी शिवसेना नेते उदय सांगळेंचे होतेय राज्यभर कौतुक! 

शिवसेना नेते उदय सांगळे आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या पुढाकाराने सिन्नर येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा झाल्या. या स्पर्धेतील समन्वय, सुविधा आणि आयोजनातील नेटकेपणाची राज्यभर चर्चा होत आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनकडून त्यांना खासदार गजानन किर्तीकर यांच्या हस्ते मुंबईत झालेल्या समारंभात पुरस्कार देण्यात आला.
कबड्डीच्या योगदानासाठी शिवसेना नेते उदय सांगळेंचे होतेय राज्यभर कौतुक! 

नाशिक : शिवसेना नेते उदय सांगळे आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या पुढाकाराने सिन्नर येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा झाल्या. या स्पर्धेतील समन्वय, सुविधा आणि आयोजनातील नेटकेपणाची राज्यभर चर्चा होत आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनकडून त्यांना खासदार गजानन किर्तीकर यांच्या हस्ते मुंबईत झालेल्या समारंभात पुरस्कार देण्यात आला. एरव्ही राजकीय उपक्रमांसाठी चर्चेत असणाऱ्या सांगळे यांचे या पुरस्काराने राज्यभर कबड्डीसाठी कौतुक होत आहे. 

उदय सांगळे यांच्या सह्याद्री युवा मंचतर्फे 31 ऑक्‍टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान सिन्नरला 66 वी वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्‍यपद व निवड चाचणी स्पर्धा झाली. त्यात पंचवीस जिल्ह्यांतील 25 महिलांचे व 25 पुरुषांचे असे पन्नास संघांचे सहाशे खेळाडू सहभागी झाले. खेळाडू, संघ प्रशिक्षक, स्वयंसेवक, पदाधिकारी अशा एक हजार व्यक्तींचा त्यात सहभाग होता. त्यासाठी भव्य क्रिडा नगरी उभारण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षी शीतल सांगळे यांचाह त्यात पुढाकार असल्याने जिल्हा परिषदेने त्याला सहकार्य दिले होते. 

या स्पर्धांच्या यशस्वी नियोजन, सुविधा व समन्वयासाठी उदय सांगळे यांना राज्य कबड्डी महासंघाच्या मुंबईत झालेल्या मेळाव्यात खासदार गजानन किर्तीकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी महासंघाचे सरकार्यवाह अॅड अरविंद पाटील, देवराम भोईर, प्रताप शिंदे, मंगल पांडे, सचिन भोसले, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. सिन्नरला झालेल्या स्पर्धांतील नियोजनासाठी त्याची राज्यभरातील खेळाडू, संयोजकात चर्चा असल्याने एरव्ही विविध राजकीय उपक्रमांसाठी चर्चेत असणारे शिवसेना नेते सांगळे सध्या क्रिडा स्पर्धेच्या आयोजनासाठी चर्चेत आले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com