दीपक साळुंखे-पाटील यांच्या राजीनाम्यामुळे सांगोल्यातील महायुतीत चिंता

माजी आमदार दीपक साळुंखे- पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या पक्षबदलाबाबतही सगळीकडे चर्चा सुरु झाल्या आहेत. या राजीनाम्यामुळे सांगोला तालुक्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. तालुक्यात महायुतीमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच लागणार असुन शेकापमध्ये आ. गणपतराव देशमुखांच्या वारसदाराची चिंता सतावत आहे.
Deepak Patil Sangola
Deepak Patil Sangola

सांगोला : माजी आमदार दीपक साळुंखे- पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या पक्षबदलाबाबतही सगळीकडे चर्चा सुरु झाल्या आहेत. या राजीनाम्यामुळे सांगोला तालुक्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. तालुक्यात महायुतीमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच लागणार असुन शेकापमध्ये आ. गणपतराव देशमुखांच्या वारसदाराची चिंता सतावत आहे.

सांगोला तालुक्यात दीपक साळुंखे- पाटील यांनी येथील स्थानिक व विधानसभा निवडणुकीत नेहमीच शेतकरी कामगार पक्ष्याबरोबर जुळवून घेत आघाडी केली. या आघाडीतच त्यांनी शेकापच्या बरोबरीने आपल्या कार्यकर्त्यांनाही विविध निवडणुकीत संधी देत आमदार गणपतराव देशमुख यांच्या पाठीशी कायमच उभे राहिले. यावेळच्या विधानसभा निवडणुकीसाठी आमदार गणपतराव देशमुख यांनी आपल्या प्रकृतीच्या कारणामुळे विधानसभा लढविणार नसल्याचे सांगितल्याने तालुक्यातील अनेक इच्छुक उमेदवार विधानसभेच्या कामाला लागले आहेत. आमदार देशमुख यांनी मी निवडणूक लढविणार नसलो तरी शेकाप पक्षाचा उमेदवार निश्चितपणे निवडणूक लढवेल, असे जाहीर केले आहे. 

माजी आमदार साळुंखे- पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळची निवडणूक लढवायची असे सांगितल्याने गेल्या अनेक महिन्यापासून राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीचे नेते यासाठी कामाला लागल्याचे दिसून येत आहे. दीपक साळुंखे-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा सध्या दिला असला, तरीही ते राष्ट्रवादीलाही राम राम करून सेनेचा 'जय महाराष्ट्र' स्वीकारतील असे चित्र दिसत आहे. हा मतदारसंघ महायुतीमध्ये  शिवसेनेच्या वाट्याला असल्याने साळुंखे-पाटील हे शिवसेनेच्याच मार्गावर आहेत. 

माजी आमदार शहाजीबापू पाटील हे सध्या शिवसेनेमध्ये असल्याने साळुंखे-पाटील यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबाबत ते कोणती भूमीका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहाजीबापू पाटलांचा शिवसेनेपेक्षाही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर अधिक दृढ संबंध आहेत. माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक चेतन सिंह केदार यांनी अगोदरच राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तेही भाजपकडून तिकीट मिळाल्यास निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. साळुंखे-पाटील यांनी पक्ष बदलल्यास महायुतीमध्ये विधानसभेचे तिकिटासाठी मोठी रस्सीखेच लागणार आहे. 

भाजपकडून श्रीकांत देशमुख राजश्री नागणे, चेतन सिंग केदार यांच्यासह  अनेक जण इच्छुक आहेत तर सेनेमधुन मधून माजी आमदार शहाजीबापू पाटील हे एकमेव नेते प्रबळ दावेदार आहेत. त्यातच दीपक आबांनी पक्ष बदलल्यास त्यांचीही इच्छुकांमध्ये भर पडेल. शेकापमध्ये आमदार देशमुखांचा वारसदार कोण याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत. सध्यातरी दीपक साळुंखे-पाटील यांनी पक्ष बदलल्यास सांगोल्यात भाजप-सेनेच्या महायुतीमध्ये तिकीटासाठी मोठी रस्सीखेच दिसणार आहे. तर शेकाप पक्षामध्ये आमदार देशमुखांचा वारसाची चिंता असणार आहे.

सांगोल्याची जागा राष्ट्रवादी लढविणारच
जिल्ह्यातील अनेक जणांनी पक्ष बदलला आहे. राष्ट्रवादीतील अनेक जण पक्ष सोडून गेले आहेत. सांगोला विधानसभेसाठी मी स्वतः राष्ट्रवादीकडून इच्छुक असुन आगामी विधानसभा सांगोलची जागा राष्ट्रवादी पक्ष लढविणारच - संजय पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com