शेतकरी संप ही लढ्याची सुरुवात- शिवसेना; सेनेने फुंकले रणशिंग

राज्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जो उस्फूर्त व प्रचंड पाठिंबा मिळत आहे, त्यापासून सर्व राज्यकर्त्यांनी धडा घेतला पाहिजे. शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. काही ठिकाणी रस्त्यावर जो उद्रेक घडत आहे, त्याला हिंसाचार न मानता ती शेतकऱ्यांच्या पोटातील भूकेची आग आहे, हे समजून घेतले पाहिजे.- उद्धव ठाकरे
शेतकरी संप ही लढ्याची सुरुवात- शिवसेना; सेनेने फुंकले रणशिंग

शिवसेनेची भूमिका जाहीर
मुंबई - राज्यात सुरु असलेल्या संपाला शिवसेनेने पूर्ण पाठिंबा दिला असून शेतकऱ्यांची शेवटची मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू, असे सांगत शिवसेनेने सत्तेतील आपला ज्येष्ठ सहकारी भारतीय जनता पक्षाची चांगलीच कोंडी केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या परदेशात आहेत. त्यांच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी पत्रक काढून शिवसेनेची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. राज्यात सुरु असलेल्या शेतकरी संपात व आजच्या बंदमध्ये शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूने सक्रीय आहे. 'राज्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जो उस्फूर्त व प्रचंड पाठिंबा मिळत आहे, त्यापासून सर्व राज्यकर्त्यांनी धडा घेतला पाहिजे. शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. काही ठिकाणी रस्त्यावर जो उद्रेक घडत आहे, त्याला हिंसाचार न मानता ती शेतकऱ्यांच्या पोटातील भूकेची आग आहे, हे समजून घेतले पाहिजे.' असे शिवसेनेने या पत्रकात म्हटले आहे.

'महाराष्ट्राच्या जवळजवळ सर्वच भागात शेतकऱ्यांनी संपात सहभागी होऊन एकजुटीचे अभेद्य दर्शन घडवले हे महत्त्वाचे. ही एकजूट शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती आणि हमीभाव दिल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या संपाला संपूर्ण पाठिंबा जाहीर करुन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे स्पष्ट केले. या साऱ्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या ऐक्याची एकजूट पहावयास मिळत आहे. लढ्याची ही सुरुवात आहे. शेवटची मागणी मान्य होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे' अशा ठाम शब्दात राऊत यांनी शिवेसेनेची भूमिका जाहीर केली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com