जालन्यात युवकांसाठी मतदान केंद्राबाहेर सेल्फी पॉइंट 

जालन्यात युवकांसाठी मतदान केंद्राबाहेर सेल्फी पॉइंट 

जालना : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. 23) मतदान होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत युवा मतदारांची संख्या लक्षणीय आहे. शहरातील मतदान केंद्रांवर खासकरून युवकांसाठी मतदान केल्यानंतर सेल्फी पॉइंट करण्यात आला आहे. व्हीव्हीपॅट, ईव्हीएम, सखी केंद्र, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा आदींमुळे यंदाची निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.
 
जिल्ह्यात युवा मतदारांची संख्या लक्षणीय आहे. सोशल मीडियावर युवा पिढी सक्रिय असते. आपण काय करतो, याचे अपडेट सेल्फीद्वारे सोशल मीडियावर टाकण्याची जणू स्पर्धाच चाललेली असते. युवावर्गाचे हे आकर्षण विचारात घेऊन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राबाहेर युवकांसाठी सेल्फी पॉइंट ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जालना शहरातील विविध मतदान केंद्रांवर असे सेल्फी पॉइंट राहणार आहेत. जिल्हा निवडणूक "स्विप' उपक्रमांतर्गत याबाबत तयारी पूर्ण झाली आहे. 

``शहरातील मतदान केंद्रांबाहेर सेल्फी पॉइंट ठेवण्यात आले आहेत. मतदारांनी मतदान केल्यानंतर सेल्फी काढून ते शेअर करावेत आणि राष्ट्रीय महोत्सवात कर्तव्य बजावावे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजू नंदकर यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com