आमदार सीमा हिरेंमुळे पोलिसांसाठी निधी

आमदार हिरे यांच्यासह पोलिस उपायुक्त अशोक नखाते आणि विविध नगरसेवकांनी काल या वसाहतीला भेट देऊन पाहणी केली. या भागाच्या विकासासाठी पुढाकार घेणार असल्याचे हिरे यांनी सांगितले. हिरे यांच्या पाठपुराव्यामुळे पोलिस वसाहतीचा रेंगाळलेला प्रश्‍न मार्गी लागला आहे.
आमदार सीमा हिरेंमुळे पोलिसांसाठी निधी

नाशिक : गेली वीस वर्षे उपेक्षीत राहिलेल्या पोलिस वसाहतींच्या समस्यांविषयी मंत्री अन्‌ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही आश्‍वासने मिळाली होती. मात्र वसाहत व त्यात राहणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांच्या समस्या सुटल्या नव्हत्या. या पार्श्‍वभूमीवर आमदार सीमा हिरे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून 4.82 कोटींचा निधी मंजूर झाले आहे. त्यामुळे शहरातील पोलिसांचे प्रश्‍न मार्गी लागले आहेत. 

पोलिस कर्मचाऱ्यांसाठी 1996 मध्ये ही वसाहत मंजुर झाली होती. त्यात 288 सदनिका आहेत. मात्र पुढे कर्मचारी त्यात वास्तव्यास गेल्यावर त्यांची दुरुस्ती कधीच झाली नव्हती. गेल्या काही वर्षात त्याची दुरावस्था झाली होती. अनेक इमारतींचे छत गळत होते. वीस वर्षात त्यांना एकदाही रंग देण्यात आला नव्हती. पिण्याच्या पाण्याची समस्याही होती. या इमारतींच्या दुरुस्तीसह त्यांच्या देखभालीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. आमदार हिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करुन त्यासाठी 4.82 कोटींची मंजुरी मिळविली आहे. आता लवकरच या कामा सुरवात होईल. 

आमदार हिरे यांच्यासह पोलिस उपायुक्त अशोक नखाते आणि विविध नगरसेवकांनी काल या वसाहतीला भेट देऊन पाहणी केली. या भागाच्या विकासासाठी पुढाकार घेणार असल्याचे हिरे यांनी सांगितले. हिरे यांच्या पाठपुराव्यामुळे पोलिस वसाहतीचा रेंगाळलेला प्रश्‍न मार्गी लागला आहे. 

लवकरत कामाला सुरवात 
शहराची कायदा- सुव्यवस्था पाहणाऱ्यांचे प्रश्‍न प्रलंबित राहिले होते. त्याबाबत 4.82 कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी त्याला मान्यता दिली. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल अशी माहिती आमदार सीमा हिरे यांनी यावेळी दिली 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com