Seema Claims Big Lead to Hemant Godse From Nashik West | Sarkarnama

नाशिक पश्‍चिममध्ये युतीच्या हेमंत गोडसेंना सर्वात मोठे लीड : आमदार सीमा हिरे 

संपत देवगिरे 
गुरुवार, 16 मे 2019

"महापालिकेतील १२२ पैकी युतीचे ४४ नगरसेवक आमच्या नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील आहेत. या सर्व नगरसेवकांची शक्ती आणि दोन वर्षे परिश्रम करुन भाजपने निर्माण केलेली 'वन बुथ टेन युथ' ही अभेद्य यंत्रणा युतीच्या हेमंत गोडसेंसाठी लोकसभेच्या प्रचारात उतरली होती. त्या तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांकडे काहीही संघटनात्मक प्रचार यंत्रणा नव्हती. त्यामुळे किमान पन्नास हजाराची आघाडी आम्हाला मिळेल. हे सर्वात मोठे लीड असेल,'' असा दावा भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी केला. 

नाशिक : "महापालिकेतील १२२ पैकी युतीचे ४४ नगरसेवक आमच्या नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील आहेत. या सर्व नगरसेवकांची शक्ती आणि दोन वर्षे परिश्रम करुन भाजपने निर्माण केलेली 'वन बुथ टेन युथ' ही अभेद्य यंत्रणा युतीच्या हेमंत गोडसेंसाठी लोकसभेच्या प्रचारात उतरली होती. त्या तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांकडे काहीही संघटनात्मक प्रचार यंत्रणा नव्हती. त्यामुळे किमान पन्नास हजाराची आघाडी आम्हाला मिळेल. हे सर्वात मोठे लीड असेल,'' असा दावा भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी केला. 

आमदार हिरे म्हणाल्या, ''गेल्या दीड- दोन वर्षापासून आम्ही लोकसभा निवडणूकीसाठी शीस्तबध्द पध्दतीने काम करीत होतो. संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते त्यात मनापासून सक्रीय होते. त्यामुळे मतदारसंघातील ३२७ बुथवर आमचा वन बुथ टेन युथ, बुथप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख होते. त्यांनी मतदारांचा अतिशय बारीक अभ्यास केला होता. हे लोक घरोघरी गेले. पश्‍चिम मतदारसंघात शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी बावीस असे अठ्ठेचाळीस पैकी चौव्वेचाळीस नगरसेवक आहेत. विरोधकांचे केवळ चार नगरसेवक आहेत. ही स्थिती अतिशय बोलकी आहे. आम्ही सर्व पदाधिकारी रोज चौकसभा, पत्रके वाटप, मतदारांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार करीत होते. मोटार सायकल रॅली, स्वतः उमेदवार हेमंत गोडसे तीन दिवस या भागात फिरले. युवा सेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचा रोड शो व सभा येथे झाली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे किमान पन्नास हजार मतांची आघाडी आम्हाला मिळेल यात शंका नाही. ही आघाडी निर्णायक असेल व युतीचा खासदार विजयी होईल." 

गेल्या पाच वर्षात खासदार गोडसे तसेच मी स्वतः राज्य शासनाच्या माध्यमातुन विविध योजनांचा निधी मतदारसंघासाठी आणला. मोठ्या प्रमाणात जनतेची कामे केली आहेत, असे आमदार हिरे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ''जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही सतत कार्यरत असतो. हा संपर्क निवडणुकीत मतदानाच्या रुपाने दिसेल. मतदारसंघात तीनशे कोटींची विविध कामे सुरु आहेत. ही सर्व कामे जनतेसमोंर आहेत. विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्दे नव्हते. युतीच्या उमेदवारावर टिका करण्यासारखे विषय देखील नव्हती. त्यामुळे गोडसेंच्या विजयासाठी शिवसेना, भाजप युतीसह सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी मनापासुन व जोमात काम करीत होते. त्यामुळे २०१४ पेक्षाही अधिक मतांची आघाडी युतीला मिळेल असा माझा दाव आहे.''
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख