रामदास आठवलेंना राज्यसभा मिळण्याचा पत्नी सीमा आठवले यांना विश्‍वास

रामदास आठवलेंना राज्यसभा मिळण्याचा पत्नी सीमा आठवले यांना विश्‍वास

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना राज्यसभेवर पुन्हा एकदा नक्की संधी मिळेल, असा विश्‍वास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केला. आठवले यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत लवकरच संपत आहे. राज्यातील भाजपच्या कोट्यातील एक जागा त्यांना निश्‍चित झाल्याची चर्चा आहे. माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नाव भाजपकडून राज्यसभेसाठी निश्‍चित होणार असल्याचे दिसते. त्यामुळे खासदारपदाची मुदत संपुष्टात येत असलेले संजय काकडे यांनी छत्रपती उदयनराजे यांचे भाजपसाठी काय योगदान प्रश्न उपस्थित केला होता. 

या साऱ्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना आठवले म्हणाल्या, "" आठवले यांना राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी कोणतीही अडचण वाटत नाही. आरपीआय हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्वाचा घटकपक्ष आहे. आठवले गटाची नुकतीच निवडणूक आयोगाकडे नोंद झाली आहे. त्यामुळे पक्षाचे एक कोटी सभासद करण्याचे ध्येय निश्‍चित करण्यात आले असून त्यातील 50 लाख नोंदणी एप्रिलपर्यंत होईल. त्यादृष्टीने देशभरातील नेते व कार्यकर्ते प्रयत्नशील आहे. याचवेळी पक्षाचे संघटन मजबूत व्हावे याकरिता पक्ष बांधणी करण्यात येत आहे. ईशान्य भारतातील अनेक राज्यातून सभासद नोंदणीकरिता चांगला प्रतिसाद मिळत आहे.'' 

सीएए आणि एनआरसी कायद्यावरील भूमिका स्पष्ट करताना आठवले म्हणाल्या, "" केंद्र सरकारने आणलेल्या सीएए, एनआरसी कायद्याचे आम्ही समर्थन केले असून त्याबाबतचे मत रामदास आठवले यांनी संसदेत मांडले आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी सांगलीतील तासगाव येथून निवडणूक लढविण्याबाबत मला विचारणा झाली होती. मात्र परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाही. राज्यातील महिलांवरील हल्ल्यांची स्थिती पाहता अशा प्रकारचे दावे केवळ जलदगती न्यायालयात न चालविता, अशा घटना पुन्हा घडू नये याकरिता उपाययोजना होणे गरजेचे आहे. 
वेट ऍन्ड वॉचच्या भूमिकेत 
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे. महिलांच्या बाबतीत देखील असे निर्णय अपेक्षित आहेत. राज्य सरकारच्या कामाबाबत समाधानी नाही. हे सरकार किती दिवस चालेल हे बघू. आम्ही सध्या वेट ऍण्ड वॉचच्या भूमिकेत आहोत, असे आठवले म्हणाल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com