गोंदियात पुन्हा एक 'कोरोना पॉझिटिव्ह' आढळला

जिल्ह्यात २२४ प्रवासी विदेशातून प्रवास करून आले. या प्रवाशांच्या संपर्कात ९४५ व्यक्ती आल्याचे आढळून आले आहे.
second corona virus positive patient found in gondia
second corona virus positive patient found in gondia

गोंदिया : कोरोना विषाणू संसर्गबाधित एक रुग्ण आज गोंदियात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी २७ मार्च रोजी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे आता ही संख्या दोन झाली आहे.

जिल्ह्यात २२४ प्रवासी विदेशातून प्रवास करून आले. या प्रवाशांच्या संपर्कात ९४५ व्यक्ती आल्याचे आढळून आले आहे. त्या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले होते. त्यापैकी १७८ प्रवाशांचा विलगीकरणाचा कालावधी संपलेला आहे. २ एप्रिलपर्यंत विदेशातून आलेले ६६ प्रवासी व त्यांच्या संपर्कात आलेल्या ३२५ व्यक्ती वास्तव्याच्या ठिकाणी विलगीकरणामध्ये आहेत. या सर्वांवर प्रशासनाची देखरेख आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या अनुषंगाने ३७ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. एक नमुना यापूर्वीच पॉझिटिव्ह आला आहे. शासकीय विलगीकरण कक्षात ३५ व्यक्ती उपचार घेत आहेत. दरम्यान, आज गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा एकजण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नागरीकांमध्ये धास्ती वाढल्याचे आज बघायला मीळाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com