सागरी महामार्गाला माजी मुख्यमंत्री अंतुले यांचे नाव देणार : तटकरे

सागरी महामार्गाला माजी मुख्यमंत्री अंतुले यांचे नाव देणार : तटकरे

मुरुड : कोकण किनारपट्टीवरील रेवस - रेड्डी या सागरी महामार्गाची संकल्पना माजी मुख्यमंत्री बॅ. अ. र. अंतुले यांची होती. त्यांचे हे स्वप्न मी पूर्ण करणार तसेच या सागरी महामार्गाला त्यांचेच नाव देणार असल्याची ग्वाही रायगड लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
 
मुरूड माळी समाज हॉलमध्ये तालुक्याच्या वतीने राष्ट्रवादी, शेकाप व काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार प्रसंगी तटकरे बोलत होते.

आपल्या भाषणात तटकरे म्हणाले की भारतात मोदी लाटेचा झंझावात असताना जाणकार मतदारांनी तो रायगडमध्ये रोखला. माझ्यावर जो विश्वास दाखवत चांगल्या मताधिक्याने विजयी केले. खासदार सुप्रिया सुळेंनी बारामतीचा विकास केला त्याच धर्तीवर रायगडचा सर्वांगिण विकास केला जाईल. श्रीवर्धनच्या इतकेच झुकते माप पर्यटन क्षेत्र मुरुडला देणार असुन पर्यटन दर्जा राज्य पातळीवर नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर मिळवून देणार, असा निर्धार व्यक्त केला.

आघाडीतील शेकाप व कॉंग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या संघटित प्रयत्नांमुळे विजय सुकर झाल्याचे ते म्हणाले. बॅ. अंतुले यांच्या पावलावर पाऊल ठेवुन माझी राजकीय वाटचाल सुरु असल्याचे सांगत जय - पराजयाचा आलेख मांडला. बँ. अंतुले 1959 मध्ये पाहिली विधानसभा हरले .मी 1984-85 मध्ये हरलो  ते 1989 लोकसभेला पराभूत झाले .मी 2014 मध्ये लोकसभा हरलो. मात्र नाउमेद न होता पराभवाची कारणे शोधत उणिवा दूर करत पुन्हा यश मिळवले. सरकार कुणाचेही असो विकास निधी आणण्याचे कसब पणाला लावुन रायगडचा सर्वंकष विकास करणार याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com