schollership | Sarkarnama

"सीएम'साहेब, विद्यार्थ्यांची कुंचबणा थांबवा! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 30 मार्च 2017

विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मागील वर्षापासून थकीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह महाविद्यालय
प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागतोय. शिष्यवृत्ती नसेल तर गरिबांची मुले शिकतील कशी? सीएम साहेब विद्यार्थ्यांची कुंचबणा थांबवा, अशी आग्रही मागणी
करीत आमदार गोवर्धन शर्मा यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले. 

अकोला : विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मागील वर्षापासून थकीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह महाविद्यालय
प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागतोय. शिष्यवृत्ती नसेल तर गरिबांची मुले शिकतील कशी? सीएम साहेब विद्यार्थ्यांची कुंचबणा थांबवा, अशी आग्रही मागणी
करीत आमदार गोवर्धन शर्मा यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले. 

अकोला व अमरावती जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संबंधित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मागील वर्षभरापासून थकीत आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी पात्र हजारो विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे. समाजकल्याण विभागाकडून शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यास मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत असल्याने महाविद्यालय प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न रेटून धरला. शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीवरच गरिबांच्या मुला-मुलींचे शिक्षण अवलंबून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अभावी होत असलेली कुचंबणा थांबविण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची थकीत रक्कम तातडीने
जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी समाजकल्याण विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख