चिपळूणच्या 23 गावांत अनुसूचित जातीची लोकसंख्या शून्य दाखवल्याने संताप

केंद्र सरकारकडून 2011 मध्ये झालेल्या राष्ट्रीय जणगणनेत तालुक्‍यातील 50 हून अधिक गावात चुकीच्या नोंदी झाल्या आहेत.
scheduled caste unrest in chiplun taluka
scheduled caste unrest in chiplun taluka

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्‍यातील 23 गावांत अनुसूचित जातीची लोकसंख्या शून्य दाखवण्यात आल्याने संताप उसळला आहे. या विरोधात सर्व गावांनी हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन आज झालेल्या बैठकीत करण्यात आले. प्रत्येक गावाने स्वतंत्र हरकती नोंदवण्याचे ठरवण्यात आले. 

अनुसूचित जातीची लोकसंख्या शून्य दाखवण्यात आल्याबाबत चर्चा करण्यासाठी आज चिपळूण तालुका बौद्धजन हितसरंक्षक समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस तालुक्‍यातील 8 ते 10 गावांतील बौद्धवाड्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत संस्थेच्या वतीनेही तहसीलदार, प्रांत यांना निवेदन देण्याचे ठरले. 

केंद्र सरकारकडून 2011 मध्ये झालेल्या राष्ट्रीय जणगणनेत तालुक्‍यातील 50 हून अधिक गावात चुकीच्या नोंदी झाल्या आहेत. या गावांमध्ये अनुसूचित जाती, जमातीचे लोक वर्षानुवर्षे वास्तव्यास असताना त्यांची नोंद अनुसूचित जातीत झालेली नाही. परिणामी या समाजाला गेली 10 वषे ग्रामपंचायत स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. शासनाने झालेली चूक सुधारून समाजाला न्याय द्यावा, असे मत चिपळूण तालुका बौद्धजन हितसरंक्षक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी व्यक्त केले. 

आगामी जनगणनेवेळी मोठ्या प्रमाणात सामाजिक जागृती करण्याचे ठरवण्यात आले. कुशिवडे व कोळकेवाडी येथील पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र, सध्यातरी यात सुधारणा करणे शक्‍य नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. तरीही अन्याय झालेल्या गावांनी एकाचवेळी हरकती नोदंवण्याचा निर्णय घेण्यात आला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com