SC verdict about ram janmbhoomi | Sarkarnama

त्या ढाच्याखाली मंदिर होते... : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक निकालाचे वाचन सुरू

नवी दिल्ली : सरन्यायाधीश रंजन गगोई यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने रामजन्मभूमीच्या वादावर निकाल देताना निर्मोही आखाडा आणि शिया वक्फ बोर्ड यांच्या याचिका फेटाळल्या आहेत.

तसेच रामजन्मभूमी ही या खटल्यातील कायदेशीर व्यक्ती नाही, असेही या निकालात म्हटले आहे. पुरातत्त्व विभागाने सादर केलेल्या अयोध्या येथील त्या ढाच्याखालील उत्खननात मंदिराचे अवशेष सापडले होते, यास सर्वोच्च न्यायालयाने दुजोरा दिला.

गगोई यांच्यासह इतर चार न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. बरोबर साडेदहा हे ऐतिहासिक निकालपत्र देण्यास सुरवात केली. पाचही न्यायाधीशांनी एकमताने हा निकाल दिला. रामजन्मस्थान हे आहे की नाही, याबाबत पुरातत्व खात्याच्या अहवालात स्पष्ट उल्लेख नसल्याचे या निकालपत्राच्या वाचनात म्हटले आहे. संपूर्ण निकाल अद्याप जाहीर व्हायचा आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स


संबंधित लेख