sc verdic on ayodhya : sc allots land to ram janmbhoomi nyas | Sarkarnama

बाबरी मशिदीची जागा मंदिरासाठी द्या : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

तब्बल दिडशे वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या अयोध्येतील जमिनीचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला.  

नवी दिल्ली : सरन्यायाधीश रंजन गगोई यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने रामजन्मभूमीच्या वादावर तोडगा काढत बाबरी मशीदिची जागा रामजन्मभूमी न्यासला देण्याचा निर्णय दिला. हा निकाल देताना सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि शिया वक्फ बोर्ड यांच्या याचिका फेटाळल्या आहेत.

या जमिनीचा मालकी हक्क हा  मंदिर बांधण्यासाठी देण्याचे या निकालात म्हटले आहे. तसेच अयोध्येत मशीद उभारण्यासाठी केंद्र किंव राज्य सरकारने पाच एकर  जमीन द्यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

तसेच रामजन्मभूमी ही या खटल्यातील कायदेशीर व्यक्ती नाही, असेही या निकालात म्हटले आहे. पुरातत्त्व विभागाने सादर केलेल्या अयोध्या येथील त्या ढाच्याखालील उत्खननात मंदिराचे अवशेष सापडले होते, यास सर्वोच्च न्यायालयाने दुजोरा दिला.

गगोई यांच्यासह इतर चार न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. बरोबर साडेदहा हे ऐतिहासिक निकालपत्र देण्यास सुरवात केली. पाचही न्यायाधीशांनी एकमताने हा निकाल दिला. रामजन्मस्थान हे आहे की नाही, याबाबत पुरातत्व खात्याच्या अहवालात स्पष्ट उल्लेख नसल्याचे या निकालपत्राच्या वाचनात म्हटले आहे. संपूर्ण निकाल अद्याप जाहीर व्हायचा आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख