sc refuses inquiry in rafel deal | Sarkarnama

मोदी सरकारची मोठ्या आरोपातून मुक्तता : 2019 साठी बुस्टर डोस

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला सर्वात मोठा दिलासा दिला. राफेल विमान खरेदीत गैरव्यवहार झाला नसून सीबीआय चौकशीची गरज नसल्याचा निकाल सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज दिला. त्यामुळे मोदी सरकारवरील मोठे संकट टळले आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला सर्वात मोठा दिलासा दिला. राफेल विमान खरेदीत गैरव्यवहार झाला नसून सीबीआय चौकशीची गरज नसल्याचा निकाल सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज दिला. त्यामुळे मोदी सरकारवरील मोठे संकट टळले आहे.

विधिज्ञ प्रशांतभूषण यांनी ही याचिका दाखल केली होती. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला या डिलमध्ये झुकते माप देण्यात आल्याचा आरोप होत होता. काॅंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधी पक्षांनी या व्यवहारावर कडाडून टीका केली होती. राफेल विमानाच्या किमतीवरून राहुल यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले होते.

मात्र सर्वोच्च न्यायालयाने सर्व आक्षेपांना रद्दबादल ठरवत विमानाच्या किमतीवरून प्रश्न उपस्थित करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. तसेच या व्यवहारात कोणात्याही कंपनीला झुकते माप देण्यात आले नसल्याचा निर्वाळा दिला. यामुळे भाजपला बळ मिळाले आहे. राहुल गांधी यांनी चुकीचे आरोप केल्याने त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. दुसरीकडे काॅंग्रेसने या व्यवहाराच्या चौकशीसाठी संसदीय समिती नेमण्याचा आपला मुद्दा कायम ठेवला आहे.

प्रशांतभूषण यांनी या निकालाबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच फेरयाचिका दाखल करण्याचा मनोदय व्यक्त केला. तीन राज्यांतील विधानसभांचे निकाल विरोधात गेल्यानंतर भाजप नेते बचावात्मक पावित्र्यात गेले होते. आजच्या निकालानंतर अध्यक्ष अमित शहा यांच्यासह सारेच आक्रमक झाले आहेत. 

संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सत्य परेशान हो सकता है, परेशान नही, अशी आपली प्रतिक्रिया यारवर दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख