SC Gives verdict on Ram Mandir | Sarkarnama

वादग्रस्त जागा राममंदीर न्यासाकडेच : न्यास स्थापून मंदीर बनविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

अयोध्येतील वादग्रस्त जागी मशिद नव्हती. तिथे राममंदीराचे अवशेष होते असे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाने ही जागा राममंदीर न्यासाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहे. सुमारे १३४ वर्षांनंतर राममंदीर- बाबरी मशिद वादावर निकाल देण्यात आला आहे.

नवी दिल्ली - अयोध्येतील वादग्रस्त जागी मशिद नव्हती. तिथे राममंदीराचे अवशेष होते असे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाने ही जागा राममंदीर न्यासाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहे. सुमारे १३४ वर्षांनंतर राममंदीर- बाबरी मशिद वादावर निकाल देण्यात आला आहे.

सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने हा निकाल दिला आहे. ट्रस्ट स्थापून मंदीर बांधण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत पाच एकर जागा पर्यायी म्हणून देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निकालाने जल्लोष केला जात आहे. घटनापीठाने हा निर्णय एकमताने दिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख