SC dismisses Nirbhaya convict petition challenging rejection of mercy plea  | Sarkarnama

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण; विनय शर्माची याचिका फेटाळली 

पीटीआय
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि खूनप्रकरणी शिक्षा झालेल्या चार दोषींपैकी एक विनय शर्मा याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली.

नवी दिल्ली - दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि खूनप्रकरणी शिक्षा झालेल्या चार दोषींपैकी एक विनय शर्मा याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. अप्रामाणिक उद्देशातून ही याचिका केली असल्याचे खंडपीठाने या वेळी नमूद केले. दया याचिका फेटाळून लावण्याच्या राष्ट्रपतींच्या निर्णयाला विनय याने न्यायालयात आव्हान दिले होते. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. भानुमती, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने विनयची याचिका आज झालेल्या सुनावणीवेळी फेटाळून लावली. दया याचिका फेटाळण्याच्या निर्णायावर न्यायिक पुनर्विचार होऊ शकत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख