सावंतवाडीत राणेंचा डंका: सभापतीपदी भाजपच्या धुरी कॉंग्रेसला दणका

सावंतवाडीत राणेंचा डंका: सभापतीपदी भाजपच्या धुरी कॉंग्रेसला दणका

सावंतवाडी : कॉंग्रेसकडून बजाविण्यात आलेला पक्षाचा व्हीप डावलून येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत अपेक्षेप्रमाणे भाजपने बाजी मारली. सभापती मानसी धुरी तर उपसभापती शितल राऊळ यांनी महाविकास आघाडीच्या मनिषा गोवेकर व मेघश्‍याम काजरेकर यांचा 13 विरुध्द 5 अशा फरकाने पराभव केला. येथील पंचायत समितीची सभापती व उपसभापती निवड आज पंचायत समिती सभागृहात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मूळ कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या व राणे समर्थक असलेल्या 10 हा सदस्यांना कॉंग्रेस प्रदेशकडून बजावण्यात आला होता. 

मूळ कॉंग्रेसच्या असलेल्या मनिषा गोवेकर तर शिवसेनेचे मेघश्‍याम काजरेकर हे सभापती उपसभापतीच्या रिंगणात महाविकास आघाडीच्या माध्यमातून होते. पंचायत समितीत मुळ कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेली सदस्य संख्या एकूण अकरा आहे. त्यापैकी मनिषा गोवेकर सोडता दहा सदस्यांना कॉंग्रेसने व्हीप बजावताना महा विकास आघाडीच्या सभापती व उपसभापती यांना मतदान करा, असे सूचित केले होते. मात्र तसे न होता राणे समर्थक असलेल्या दहाही सदस्यांनी भाजपच्या बाजूने मतदान केल्याने याठिकाणी पुन्हा राणेसमर्थक भाजपकडे सत्ता आली. 

गेल्यावेळी उपसभापती निवडीदरम्यानही कॉंग्रेसने व्हीप बजावली होता; मात्र त्यावेळीही राणे समर्थकांनी सत्ता काबिज केली होती. आजही तेच चित्र याठिकाणी पाहायला मिळाले. गतवेळी भाजपाचे सदस्य शिवसेनेसोबत होते; मात्र यावेळी खुद्द राणे भाजपात गेल्याने यावेळी ही निवड भाजपाच्या बाजूने होणार हे निश्‍चित होते; मात्र कॉंग्रेसकडून खेळण्यात आलेल्या खेळीनंतर सर्वांचे लक्ष या निवडीकडे लागले होते. मानसी धुरी व शीतल राऊळ यांच्या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्याने पंचायत समिती परिसरात जोरदार घोषणाबाजी करत एकच जल्लोष केला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने पंचायत समिती परिसरात उपस्थित होते. 
अभिनंदनाचा वर्षाव 
सभापतीपदी मानसी धुरी तर उपसभापतीपदी शीतल राऊळ यांची वर्णी लागल्यानंतर भाजपा प्रदेश सरचिटणीस राजन तेली, तालुकाध्यक्ष महेश सारंग, जिल्हा बॅंक संचालक अतुल काळसेकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजू परब आदींनी भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजप पक्षाचा विजय असो, नारायण राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com