savitribai phule jayanti in karnataka | Sarkarnama

कर्नाटकमध्ये साजरी होणार सावित्रीबाई फुलेंची जयंती 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 जानेवारी 2020

महात्मा जोतिबा फुले यांच्या पत्नी व पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची साऱ्या देशाला ओळख आहे.

बंगळूर : देशातील पहिल्या महिला शिक्षिका आणि पुणे (महाराष्ट्र) येथे महिला शिक्षणासाठी ज्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची दखल आता कर्नाटक शासनानेही घेतली आहे. राज्य सरकारने कर्नाटकातील सर्व शाळा, महाविद्यालयात दरवर्षी 3 जानेवारी रोजी जयंती साजरी करण्याचा आदेश दिला आहे. 

महात्मा जोतिबा फुले यांच्या पत्नी व पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची साऱ्या देशाला ओळख आहे. समाजातील महिलांनी शिकावे, त्यांनी समाजकार्यात पुढे यावे, यासाठी फुले दांपत्याने पुण्यात आपल्या कार्याला सुरुवात केली. पारंपरिक जीवन जगणाऱ्या समाजात शिक्षणासारखे महत्त्वाचे कार्य करूनही फुले दांपत्याला मानहानी पत्कारावी लागली. भारतात महिलांचा जो सर्वक्षेत्रात विकास झाला आहे, महिला पुढे आल्या आहेत, त्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा महत्त्वाचा वाटा आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान विचारात घेऊन कर्नाटक सरकारने सर्व शाळा, महाविद्यालयांत त्यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगावमध्येही गटशिक्षणाधिकारी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सावित्रीबाई फुले यांची जयंती शाळांमधून साजरी करून त्यांच्या कार्याची माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख