रस्त्यावरील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले आमदार सावे...

 रस्त्यावरील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले आमदार सावे...

औरंगाबाद : जालना रोडवर रामगिरी चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेने लक्ष्मी नारायण तिवारी (वय 43, रा. तेवरीपुर,उत्तर प्रदेश) यांना गुरुवारी (ता.16) सहा वाजण्याच्या अपघात झाला. अपघातानंतर त्यांनी मदतीची याचना केली, मात्र कोणीच मदतीसाठी पुढे आले नाही, त्यामुळे ते तसेच पडून होते. याच रस्त्याने जाणाऱ्या आमदार अतुल सावे यांनी त्याला बघितले व आपल्या वाहनातून घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वेळीच त्याला मदत मिळाल्यामुळे आणखी एका अपघातग्रस्तांच्या जीव वाचला आहे. 

अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहेत त्यामुळेच गेल्या पंधरा दिवसात औरंगाबादेत दोघा जणांचा बळी गेला आहे. त्यानंतर गुरुवारी पुन्हा अपघात जखमी झालेल्यांनी नागरिक आणि मदतीची याचना केली, मात्र पुन्हा कोणीही त्याला मदतीसाठी पुढे आले नाही. मुंबईहून औरंगाबादमध्ये आलेले अतुल सावे घराकडे जात असताना त्यांनी त्या अपघातग्रस्तास बघितले व तात्काळ गाडी थांबवली. जखमी लक्ष्मीनारायण तिवारी यांना आपल्या वाहनात घेत त्यांना थेट घाटी रुग्णालयात दाखल केले. 

काही दिवसांपूर्वी दौलताबाद टी पॉइंट जवळ सुमित कवडे नावाच्या युवकाचा अपघात झाला होतात , त्यावेळी त्याने मदतीची याचना सर्वांकडे केली होती, कोणीच त्याला मदत केली नाही. काही नागरिकांनी या अपघातग्रस्ताचा केवळ व्हिडिओ केला होता. दुसरी घटना हडको कॉर्नर येथील अतुल देशमुख यांच्या बाबतीत घडली, त्यांनाही वेळीच मदत न मिळालेले आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर आज पुन्हा तिवारी यांच्यासाठीही कोणीच मदतीसाठी पुढे आले नव्हते. आमदार सावे यांच्यामुळे या तिवारी यांना वेळीच मदत मिळाली आणि त्यांचा जीव वाचला. 

मी मुंबईहून परत आल्यानंतर घरी जात असताना रामगिरी चौकात अपघातग्रस्त व्यक्ती मदतीची याचना करताना आढळली, त्यांना तात्काळ मी वाहनात घेत घाटी रुग्णालयात दाखल केले. तास, दोन तासात ते शुद्धीवर येतील. त्यांचे नातेवाईक चंदीगडला असल्याचं कळलं त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत असे आमदार अतुल सावे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com