सत्यजित, आता तुलाही मतदारसंघ शोधू : विखेंनी मारली कोपरखळी

इंदोरीकर महाराजांच्या सोहळ्यात राजकीय टोलेबाजी तर होणारच!
satyajeet-tambe-vikhe-indorikar
satyajeet-tambe-vikhe-indorikar

संगमनेर ः समाजाचे भले करण्याची वैचारिक ताकद व क्षमतेमुळे समाजाचे प्रबोधन करण्याचा अधिकार इंदोरीकर महाराजांकडे आहे. त्यांचा राजकारणात प्रवेश झाला तर, ते तेवढ्याच ताकदीने राजकिय क्षेत्रातही काम करतील असे सुचक वक्तव्य करीत, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोपरखळ्या मारीत इंदोरीकर महाराजांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात चर्चेला सुरवात करुन दिली.

आपल्या आगळ्या वेगळ्या प्रबोधनाच्या शैलीमुळे अफाट लोकप्रियता लाभलेल्या इंदोरीकरांचे राजकिय क्षेत्रातही असंख्य चाहते आहेत. त्यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमाला आजी माजी राजकिय नेत्यांची आवर्जून हजेरी असते.

शनिवारी संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील विद्यालयाच्या प्रांगणात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेल्या कार्यक्रमासाठी मंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार रोहीत पवार, आमदार आशुतोष काळे, दिवंगत आर. आर. पाटलांचे चिरंजीव रोहीत पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे आदीची उपस्थिती असल्याने, या व्यासपीठावर राजकीय जुगलबंदी रंगली नसती तरच नवल!

सत्यजीत तांबे यांनी भाषणात विधानसभा निवडणुकीत इंदोरीकर महाराजांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चेमुळे थोडे धास्तावल्याचा उल्लेख केल्याचा धागा पकडून इंदोरीकर महाराजाच्या उमेदवारीची आम्हाला अपेक्षा होती; पण आम्ही आग्रह धरला नव्हता. आम्ही शक्य असेल तिथेच आग्रह धरतो असा सूचक टोला लगावून, सत्यजीत.. भविष्यात तुलाही मतदारसंघ शोधून द्यावा लागेल पण मामाला रिटायर कर असे आमचे म्हणणे नाही अशी नेमकी संधी राधाकृष्ण विखेंनी साधली.

इंदोरीकर महाराजाच्या कीर्तनाचे फ्लेक्स बोर्ड गावोगावी दिसतात. राजकारण्यांचे बोर्ड कमी झाले आणि महाराजांचे वाढले याकडे कटाक्ष टाकीत विखे म्हणाले, आता कोणताच कार्यक्रम इंदोरीकर महाराजांशिवाय होवू शकत नाही एवढी लोकप्रियता त्यांना मिळाली आहे. त्यांनी राजकारणात प्रवेश केला तर.. ते राजकारणातही निश्चित अधिकार गाजवतील असा विश्वास व्यक्त केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com