राज ठाकरेंवरील कारवाई म्हणजे विरोधकांना नामोहरम करण्याचा कुटील डाव : सत्यजित तांबे

..
Satyajit_Tambe supports Raj Thakre
Satyajit_Tambe supports Raj Thakre

भिवंडी  : येत्या विधानसभा निवडणुकीस सामोरे जाताना युवक कॉंग्रेसच्यावतीने युवकांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार असून , त्याना सोबत घेऊन युवक विधानसभा निवडणुकीस सामोरे जाणार आहे. त्यासाठी बुथ निहाय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्याची मोट बाधून कॉंग्रेस पक्ष मजबूत केला जाईल बुथ निहाय मार्गदर्शनाच्या माध्यमातून या निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष यश संपादन करेल, असा विश्वास युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी भिवंडीत झालेल्या युवक कॉंग्रेसच्या जिल्हा निहाय आयोजित सुपर सिक्‍स्टी या मेळावा कार्यक्रमात व्यक्त केला.

ठाणे जिल्हा स्तरीय युवक कॉंग्रेसच्या बुथ कार्यक्रम मेळावा स्व.टावरे स्टेडियम येथील सभागृहात काल सायंकाळी आयोजित केला होता. प्रसंगी युवक कॉंग्रेस प्रदेश प्रभारी प्रतिभा रघुवंशी ,प्रदेश युवक सरचिटणीस रिषिका राका, बी एम संदीपन, पालिका सभागृह नेते प्रशांत लाड, माजी सभापती प्रदिप राका, शहराध्यक्ष शोएब खान युवक भिवंडी अध्यक्ष अरफात खान,हर्षाली मनोज म्हात्रे अदि पदाधिकारी उपस्थित होते.

आपला देश युवकांचा देश म्हणून संबोधला जात असून येत्या विधानसभा निवडणुकीत युवकांचा सहभाग वाढवीत असताना त्यांना असणा-या आशा आकांक्षा , अपेक्षा या बाबत ऑन लाईन व ऑफ लाईन च्या माध्यमातून किमान एक कोटी युवकांशी संपर्क साधून युवकांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार असून ,त्यास वेक अप महाराष्ट्र असे नाव दिले आहे .

तर सुपर सिक्‍स्टी या कार्यक्रमाच्या माध्यमातून बुथ निहाय युवक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन प्रशिक्षण देत असून त्या माध्यमातून युवक कार्यकर्त्यांचं फळी मजबूत करणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले . 

भाजपा शिवसेना पक्षांकडून कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार पाडण्याचा कार्यक्रम सुरु आहे. पक्षाने मोठे केलेल्यानी पक्ष सोडून जाण्याने फरक पडत नसून त्यांच्या जाण्याने कित्येक वर्ष जागा अडवून बसलेय ठिकाणी ख-या अर्थाने त्यामुळे युवक कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याने रिकाम्या जागा युवक कार्यकर्ते भरून काढतील असे सांगितले.

राज ठाकरे यांच्या वरील ईडीच्या नोटिसी संदर्भात बोलताना सांगितले की जुनी प्रकरणे उकरून काढून विरोधकांना नामोहरम करण्याचा कुटील डाव भाजपा कडून खेळला जात आहे. असे मत प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकबाल सिद्दीकी यांनी केले . या कार्यक्रमास भिवंडीसह मिरा भाईंदर ,ठाणे,कल्याण येथून मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते उपस्थित होते .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com